घरAssembly Battle 2022Uttarakhand Election 2022: उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवारांमध्ये पेटला संघर्ष, व्हिडिओ व्हायरल

Uttarakhand Election 2022: उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवारांमध्ये पेटला संघर्ष, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर काल (रविवार) मतदारांच्या घरोघरी जाऊन जनसंपर्क करताना भाजपचे उमेदवार तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार एसएस कलेर यांच्यात संघर्ष पेटला. कलेर यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर लावल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तसेच हे आरोप निराधार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर धामी कार्यकर्त्यांसह जनसंपर्कासाठी नेपाळ सीमेवरील धरणाच्या वरच्या भागात पोहोचले होते. परंतु तिथे आपचे उमेदवार एसएस कलेर हे देखील आपल्या उमेवारांसोबत जनसंपर्क करत होते. क्लेर यांनी भाजपवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून मुख्यमंत्री धामी आणि कलेर यांच्यात जोरदार संघर्ष पेटला.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवारांमध्ये पेटला संघर्ष

साडेनऊ वर्ष आमदार आणि सहा महिने मुख्यमंत्री म्हणून काम केलं असतं तर आज ब्लँकेट, मशीन, प्रेशर कुकर, टिकली आणि साड्या वाटण्याची गरज पडली नसती. मुख्यमंत्री त्यांच्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायचे आणि इतर उमेदवारांना विजयी करायचे. आमदार निधीसह इतर गोष्टींवर खर्च करण्याऐवजी आता ते विजयासाठी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आपचे उमेदवार एसएस कलेर म्हणाले.

- Advertisement -

हा विधानसभा मतदारसंघ माझा आहे. मी घरोघरी जाऊन परिसरातील लोकांच्या भेटीसाठी जात आहे. विरोधक मुद्यांपासून वंचित आहेत. कारण पराभव त्यांच्या जवळ येत आहे. माझ्या कार्यकाळात मी परिसरातील जनतेची सेवा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक विकामकामं केली आहेत. मी माझ्या लोकांना भेटायला नक्की जाईन, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी म्हणाले.

टेडाघाट गावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांमध्ये साडी भरलेली गाडी पकडली. वाहनांमध्ये राजकीय पक्षाचे पत्रक आण इतर वस्तू ठेवण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तसेच वाहन पकडल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा : Uttarakhand Election 2022: उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदानाला सुरूवात, ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांचे ठरवणार भवितव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -