घरक्रीडाIPL Auction 2022 : IPL ची किमया ! इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्याधीश

IPL Auction 2022 : IPL ची किमया ! इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्याधीश

Subscribe

कोचने महत्वाच्या प्रसंगी मदत केल्यानेच आज याठिकाणी पोहचणे शक्य झाल्याचे तिलक वर्माने सांगितले

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत दिग्गज खेळाडूंवर एकही रूपयाची बोली लागली नाही हे दोन दिवसाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये पहायला मिळाले. तर दुसरीकडे एका इलेक्ट्रिशिअनच्या मुलाचे नशीब उघडले ते आयपीएलमुळे. हैद्राबादचा चंद्रयानगुट्टा येथून खेळणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय मुलाची निवड यंदाच्या आयपीएल लिलावात झाली आहे. स्टांस, कट आणि पुल शॉटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या खेळाडूवर तब्बल १ कोटी ७० लाखांची बोली लागली. एक सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलासाठी आयपीएलने आंतरराष्ट्रीय पातळीवर संघातून खेळण्यासाठी एकप्रकारे मार्गच खुला करून दिला आहे. या खेळाडूचे वडिल इलेक्ट्रिशिअन म्हणून काम करतात. वडिलांची आयुष्यभराची मेहनतीची किंमत संपली, तेव्हा या खेळाडूचा कोच मदतीला धावून आला.

कोण आहे तिलक वर्मा ?

तिलक वर्माने आतापर्यंतच्या फर्स्ट क्लास करिअरमध्ये १ सामना खेळला आहे. तर लिस्ट ए चे १६ सामने आणि टी २० चे १५ सामने खेळले आहेत. १६ लिस्ट ए मॅचमध्ये त्याने तीन शतक आणि तीन अर्धशतकांसह ७८४ धावा केल्या आहेत. सर्वोच्च खेळी १५६ धावांची आहे. तर टी २० क्रिकेटमध्ये तीन अर्धशतके झळकवली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १४४ राहिला आहे. तर फलंदाजीसोबत त्याने ऑफ स्फिन गोलंदाजीही केली आहे. त्याच्या नावे ५ विकेट्स आहेत.

- Advertisement -

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत तिलक वर्मा या खेळाडूला मुंबई इंडियन्सच्या संघाने खरेदी केले. आपले कोच सलाम बायश यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो, असे तिलक वर्मा सांगतो. अनेकदा क्रिकेट खेळण्यासाठीच्या गोष्टी खरेदी करून देतानाच कोचिंग, जेवणापासून ते वेळप्रसंगी घरी राहण्यासाठीही जागा दिली. आज जे काही आहे, ते कोचमुळेच आहे, असेही श्रेय त्याने दिले.

माझे वडिल नम्बूरी नागराजू यांची मला क्रिकेट अकादमीत पाठवण्याची क्षमता नव्हती. पण कोचने केलेल्या आर्थिक मदतीमुळेच आज मी आयपीएल खेळण्यासाठी पात्र ठरलो. माझ्या सगळ्या मेहनतीमागे कोच यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे आजचा दिवस हा त्यांच्या निश्चयानेच पहायला मिळाला असेही त्याने सांगितले. एकवेळ माझ्याबद्दल प्रसिद्धीसाठी काही करू नका, पण माझ्या कोचसाठी मात्र काही तरी लिहा, असेही आवाहन त्याने केले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -