घरताज्या घडामोडीकाँग्रेस संपली.., मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं मोठं वक्तव्य

काँग्रेस संपली.., मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं मोठं वक्तव्य

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसबाबत मोठं वक्तव्यं केलं आहे. फक्त दोन महिने बाकी आहेत. भाजपची सत्ता जाणार आहे. तर आपची सत्ता येणार आहे. गुजरातमधील सर्व जागा आम्ही लढवू. आता काँग्रेस संपली आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये असताना म्हणाले की, काँग्रेस संपली आहे. त्यांचे प्रश्न मांडणे बंद करा. मी गेल्या अनेक महिन्यांपासून गुजरातमध्ये फिरतोय, जनतेला भेटतोय. वकील, रिक्क्षा चालक, शेतकरी, व्यापारी, या सर्वांनी सांगितले की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोणत्याही सरकारी खात्यात काम मिळवायचे असेल तर पैसे द्यावे लागतात. खालच्या स्तरावर भ्रष्टाचार आहे. वरील आरोप तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोलाल तर ते घाबरवून धमक्या देण्यापर्यंत पोहोचतात. व्यापारी आणि उद्योगपतींना धाडी टाकून तुमचा व्यवसाय बंद पाडू, अशी धमकी दिली. आजूबाजूला भ्रष्टाचार आणि गुंडगिरी आहे. आज आम्ही हमी देतो. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन दिले जाईल, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलं.

- Advertisement -

आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो, इतर कोणाचाही असो, कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही, भ्रष्टाचार केला तर तुरुंगात पाठवू, असे केजरीवाल म्हणाले.

गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या विकासावर खर्च केला जाईल. त्यामुळे नेते, मंत्री, आमदार यांचे सर्व काळे धंदे बंद होतील. विषारी दारू विकली जाते, एवढी नशा कुठून येते. या पार्ट्यांमध्ये त्यांचे पालक बसलेले असतात. हे सर्व बंद होणार, असं केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा :प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांनी फक्त दहिहंडीच फोडत बसायची?, थोरातांचा संतप्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -