नुपूर शर्मावर कारवाई केल्यानंतर भाजपने गदारोळ करण्याची गरज काय?, नितीश कुमारांचा सवाल

Nitish Kumar JDU

प्रेषित पैगंबर मोहम्मद (prophet muhammad) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशासह विदेशातही गदारोळ सुरू आहे. याविरोधात देशभरातील अनेक भागात निदर्शनं होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपने एवढा गदारोळ करण्याची गरज काय?, असा सवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी उपस्थित केला आहे.

नितीश कुमार यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने आधीच कारवाई केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखाल दाखल करण्यात आला आहे. मात्र, असे असूनही हिंसक घटना होत असतील तर त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण काही लोकं आपापसात जाणूनबुजून भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असं नितीश कुमार म्हणाले.

बिहारमध्ये वादाचे कोणतेही वातावरण नाहीये. रांचीमध्ये जेव्हा हिंसाचार झाला होता त्यावेळी बिहार सरकारचे मंत्री नितीन नवीन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याची जबाबदारी झारखंड सरकारची असल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे.

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर बराच वाद निर्माण झाला आहे. अरब देशांनीही नुपूरच्या वक्तव्याच्या निषेध केला आहे. शुक्रवारी दिल्ली, रांची, लखनौ, प्रयागराज, कोलकाता आणि महाराष्ट्रात सुद्धा नुपूर शर्माविरोधात बरीच निदर्शनं झाली. निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. यामध्ये काही जणांचा मृत्यू देखील झाला. मात्र, नुपूर शर्मा यांच्याविरोधात पुढील कारवाई केली जात आहे.


हेही वाचा : राहुल गांधींची ईडीकडून ३ तास चौकशी, जेवणानंतर पुन्हा होणार चौकशी