तुमच्या आजूबाजूला असलेला स्पाय कॅमेरा ‘असा’ शोधा

आपल्या आजूबाजूला स्पाय कॅमेरा आहे की नाही हे तपासणं जरा कठीण असतं. पण काही युक्त्या वापरल्यास तुम्हाला स्पाय कॅमेरा शोधायला मदत होईल.

spy camera

गेल्या काही वर्षांपासून स्पाय कॅमेऱ्याच्या (Spy Camera) माध्यमातून छुप्या पद्धतीने चित्रिकरण केलं जातं. यामुळे अनेकदा महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. महिलांचं चित्रिकरण करून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यामुळे अनोळख्या ठिकाणी वास्तव्याला जाताना तिथे स्पाय कॅमेरा (Hidden Camera) आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे. (How to check hidden spy camera around us)

आपल्या आजूबाजूला स्पाय कॅमेरा आहे की नाही हे तपासणं जरा कठीण असतं. पण काही युक्त्या वापरल्यास तुम्हाला स्पाय कॅमेरा शोधायला मदत होईल.

हेही वाचा – इंटरनेटचा एक काळ गाजवणारे मायक्रोसॉफ्टचे ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ अखेर बंद

हिडन कॅमेरे अशा ठिकाणी लावले जातात, जिथे लोकांची सहसा नजर पडत नाही. त्यामुळे हे हिडन कॅमेरे सापडणं कठीण असतं. मध्यंतरी मध्य प्रदेश येथील एका प्रकरणात मुलींच्या हॉस्टेलमधील बाथमरुमच्या शॉवरमध्ये स्पाय कॅमेरा लावण्यात आला होता.

जर तुम्ही कोणत्याही हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये थांबत असाल तर तेथील बाथरुमचे शॉवर, टेबल आणि छप्पर आवश्य तपासून घ्या.

हेही वाचा – Reliance Jio युजर्सना झटका! ‘हा’ प्लान केला बंद; आता मोजावे लागणार इतके पैसे?

यासाठी तुम्ही नाईट व्हिजन सिक्यूरिटी कॅमेराचा वापर करू शकाल. यामुळे तुम्हाला आजूबाजूला असलेल्या हिडन कॅमेऱ्याची माहिती मिळेल.

रुममधील लाईट्स घालवा

हिडन कॅमेरामध्ये हिरवी आणि लाल लाईट असते. ती सतत चमकत असते. त्यामुळे तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये गेल्यास सर्वप्रथम रुममधील सर्व लाईट्स बंद कराव्यात. जेणेकरून स्पाय कॅमेऱ्याची हिरवी आणि लाल लाईट तुम्हाला दिसेल.

फोन लागतो का पहा

तुमच्या आजूबाजूला स्पाय कॅमेरा असेल तर रेडिओ फ्रिक्वेंसीमुळे मोबाईलवरून कॉल करणे कठीण होईल. अशा घरात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर जर तुम्हाला फोन करण्यास अडचणी येत असतील तर तेथील हिडन कॅमेरा नक्की तपासा.

मोबाईल अॅपचा वापर करा

असे अनेक मोबाईल अॅप्स उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही आजूबाजूला असलेले हिडन कॅमेरे तपासू शकता. असे अॅप तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवर सहज उपलब्ध होतील.