घरदेश-विदेशखुशखबर! ही कंपनी देतेय १००० लोकांना नोकरी

खुशखबर! ही कंपनी देतेय १००० लोकांना नोकरी

Subscribe

कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी सीएमएस पुढील दोन महिन्यांत एक हजार कर्मचार्‍यांच्या भरतीची योजना आखत आहे. कंपनी त्यांच्यासोबत भागीदार असलेल्या बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि मायक्रो फायनान्स संस्थांसाठी रोख वसुलीसाठी काम करणार आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, सीएमएस इन्फो सिस्टम (सीएमएस) ने महिंद्रा फायनान्स, एल अँड टी फायनान्स आणि हीरो फिनकॉर्पसह अनेक कंपन्यांशी रोख व धनादेश गोळा करण्यासाठी करार केला आहे.

सीएमएसच्या कॅश बिझिनेस युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख अनुष राघवन म्हणाले की, देशातील १,१५,००० एटीएम आणि रिटेल आउटलेट्सचे ९८.३ टक्के जिल्ह्यात कंपनीचं नेटवर्क आहे. ते पुढे म्हणाले, “सीएमएसने एनबीएफसीच्या सेवा वाढवल्या आहेत. आम्ही आता गृह बँकिंग, शिक्षण, विमा उद्योगासाठी धनादेश गोळा करणे आणि इतर उद्योगांसाठी रोख संकलन व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या प्रवासी सेवांवर लक्ष देत आहोत. यासाठी आम्ही येत्या दोन महिन्यांत एक हजार लोकांना नेमण्याचा विचार करीत आहोत. आम्ही चालू आर्थिक वर्षात आणखी विस्तार आणि अजून कर्मचाऱ्यांची भरती करणार आहोत.

- Advertisement -

रोख वसुलीशिवाय सीएमएसचे कलेक्शन एजंट NBFC आणि MFI सारखे केवायसी आणि अन्य तंत्रज्ञानाद्वारे सक्षम इतर सेवांसाठी देखील सेवा सुरु करणार आहेत. अशा कलेक्शन एजंट्सचा सरासरी पगार दरमहा ३०,००० रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असं कंपनीने सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -