अरे व्वा! आता एकाच वेळी WhatsApp वर करू शकता ५० लोकांना व्हिडिओ कॉल

Complete Process To Make Video Calling With 50 People At Whatsapp Messenger Room, Know The Whole Process
अरे व्वा! आता एकाच वेळी WhatsApp वर करू शकता ५० लोकांना व्हिडिओ कॉल

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सगळ्याच गोष्टी ऑनलाईन सुरू आहे. मग ऑफिस असो किंवा शाळा-कॉलेज-क्लास. सगळच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील असलेल्या वेगवेगळ्या Appच्या आधारे सुरू आहे. त्यामुळे सध्या सोशल नेटवर्किंग साईट असलेले Apps नवनवीन फिचर्स घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी फेसबुकने झूम Appप्रमाणे मॅसेजन रूम फिचर घेऊन आलं. झूमप्रमाणे या फिचरच्या मदतीने आपण ५० लोकांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. आता अशाच प्रकारे इन्स्टाग्राम आणि Whatsapp युजर्ससाठी पण एक फिचर उपलब्ध झाले आहे. हे फिचर तुम्ही क्लास, मिटिंगस अशा गोष्टींसाठी वापर करू शकता. हे WhatsAppचे नवे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला लेस्टेस्ट वर्जन अपडेट करणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला फेसबुक आणि मेसेंजर देखील अपडेट करावे लागेल. त्यामुळे आज आपण WhatsApp Messenger Room हे फिचर कसे वापरायचे हे जाणून घेणार आहोत.

असा ५० लोकांसोबत करा व्हिडिओ कॉल

पहिल्यांदा WhatsApp ओपन करून त्यानंतर कॉल करण्याचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. मग तुम्हाला Create a room असं ऑप्शन दिसेल ते क्लिक करावे लागले. त्यानंतर Continue in Messenger ऑप्शवर क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेंजर App ओपन होईल. मग Try it, when prompted क्लिक करून Create Room क्लिक करायचे आणि रूमाला एक नाव द्याचे. नंतर Send Link on WhatsAp वर क्लिक केल्यानंतर पुन्हा WhatsApp ओपन होईल. मग तुम्ही या रूमची लिंक ग्रुप्स आणि तुम्हाला जी व्यक्ती रूमसमध्ये पाहिजे आहे तिला शेअर करू शकता.

WhatsApp रूम असे करा जॉईन

WhatsApp वर आलेल्या रूमच्या लिंकवर क्लिक करा. मग ती मेसेंजर किंवा वेबसाईटवर ओपन होईल. त्यानंतर रूम जॉईन करण्याबरोबर ५० लोकांना तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकता.


हेही वाचा – मोबाईल पावसात भिजल्यावर ‘या’ गोष्टी अजिबात करु नका