घरदेश-विदेशNEET 2020 Exam: १३ सप्टेंबरला होणार परीक्षा, लवकरच मिळणार प्रवेशपत्र

NEET 2020 Exam: १३ सप्टेंबरला होणार परीक्षा, लवकरच मिळणार प्रवेशपत्र

Subscribe

वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणारी नीटची (NEET) परीक्षा येत्या १३ सप्टेंबरला होणार आहे. ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळात घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) ने २० ऑगस्ट २०२० रोजी एक माहितीपत्रक जारी करत दिली. हे माहितीपत्रक विद्यार्थ्यांना NTA च्या nta.ac.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

दरम्यान, परीक्षेची प्रवेशपत्रे (NEET 2020 admit cards) लवकरच डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. NTA ने याआधीच परीक्षार्थींना परीक्षांकेंद्रांबाबत माहिती दिली आहे. तथापि, NEET २०२० चे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ती ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील. दरम्यान, या प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख, केंद्राची माहिती, पत्ता, परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ, परीक्षागृहात प्रवेश करण्याची वेळ आणि केंद्र बंद होण्याची वेळ देण्यात येणार आहे. शिवाय, कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना आणि खबरदारीचे उपायही त्यावर देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई मेन्स आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सोमवारी १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात! – आशिष शेलार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -