घरदेश-विदेशकाँग्रेस-आपमधील युतीचा सस्पेन्स संपला

काँग्रेस-आपमधील युतीचा सस्पेन्स संपला

Subscribe

अखेरीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून अरविंद केजरीवाल यांनी युतीचा सस्पेन्स संपुष्टात आणला आहे.

काँग्रेस आणि आम आदमी या दोन पक्षामध्ये युती होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही दिवसांपासून यूती होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह होते. मात्र, या दोन्ही पक्षामध्ये महाआघाडी होण्याची आशा आता संपुष्टात आली आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षानी म्हणजेच दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवार दि. १ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचा युतीला नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी ‘आप’ पक्षाशी युती करण्यास नकार दिला आहे, असे ते म्हणाले. तर आप-काँग्रेसची युती होण्यासाठी केजरीवाल यांनी आपल्याशी कधीही संपर्क साधना नसल्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीतील काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी सांगितले. मात्र, यावर केजरीवाल यांनी म्हटले की, आम्ही राहुल गांधी यांची भेट घेतली. दीक्षित या काही महत्वाच्या नेत्या नाहीत, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मित्र पक्षानी घेतला पुढाकार

अलिकडेच आप पक्षाने काँग्रेस पक्षावर नाराज होत आपली लोकसभाची उमेदवारी यादी जाहीर केली होती. मात्र, आप पक्षाची काँग्रेस सोबत युती करण्याची तीव्र इच्छा होती. या दोन पक्षामध्ये युती होण्यासाठी काँग्रेसचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही पुढाकार घेतला होता. मात्र, कोणाच्याच प्रयत्नांना यश मिळाले नाही आणि अखेर युतीही झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -