घरताज्या घडामोडीआईला विचार तुझा बाप कोण? अलका लांबा आणि योगेश्वर दत्त ट्विटरवर भिडले

आईला विचार तुझा बाप कोण? अलका लांबा आणि योगेश्वर दत्त ट्विटरवर भिडले

Subscribe

आपच्या माजी आमदार, सध्या काँग्रेसच्या नेत्या असलेल्या अलका लांबा आणि ऑलम्पिक पदक विजते, सध्या भाजपचा नेता असलेल्या पैलवान योगेश्वर दत्तमध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन बाचाबाची सुरु आहे. देशात कोरोनाचे संकट उभे असताना दिल्लीत मात्र नेहमीप्रमाणे राजकीय गरमागरमी सुरु आहे. अलका लांबा या आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी परिचित आहेत. मात्र त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टिकेमुळे सध्या त्या चांगल्याच चर्चेत असून ट्विटरवर देखील ट्रेडिंगमध्ये आल्या आहेत.

या बाचाबाचीची सुरुवात ५ एप्रिलपासून झाली. भाजपच्या स्थापना दिनाच्या आदल्या दिवशी अलका लांबा यांनी एक ट्विट केले. या ट्विटसाठी वापरलेल्या फोटोमध्ये मोदींनी संघाचा गणवेश परिधान केलेला दिसतो. यावर लांबा म्हणतात, “संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण सत्य हे आहे की, भाजपचे सर्व नेते हे संघाची अनौरस उत्पत्ती आहे”

- Advertisement -

अलका लांबाचे हे ट्विट पडल्यानंतर भाजपमध्ये नवे नवे आलेले आणि पैलवान असलेले योगेश्वर दत्त देखील आखाड्यात उतरले. योगेश्वर यांनी नुकतीच हरयाणा विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली होती. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “अनौरस कोण आहे, याची माहिती आपल्या भाषेवरुन कळून येते. तुमच्या विचारावरुन तुमच्यावर काय संस्कार झालेत, हे दिसते. ज्या व्यक्तिचा फोटो तुम्ही लावला आहे, त्याच्याबद्दल देशवासियांचे किती प्रेम आहे, हे तुम्ही पाहिले असेलच. तुमच्या सारखे मानसिक रोगी सोडले तर पुर्ण देश त्यांच्या पाठिशी उभा आहे.”

- Advertisement -

योगेश्वर दत्तच्या या ट्विटनंतर मात्र अलका लांबा यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली आहे. या ट्विटनंतर योगेश्वर दत्तने मात्र सावध पवित्रा घेत या वादातून माघार घेतली. “सार्वजनिक व्यासपीठावर कोणत्या भाषेचा वापर करावा, हे तुम्हाला कळत नाही. मग मी तुमच्याकडून माझी आई किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा का ठेवू. या देशात पुरुष होण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. तुम्ही आपले महिला कार्ड खेळत रहा.”

योगेश्वर दत्तने जरी या वादातून माघार घेतली तरी त्याच्या मदतीला दुसरा पैलवान उतरला. पैलवान बजरंग पुनिया याने अलका लांबा यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत त्यांनी दत्त यांची माफी मागावी, अशी मागणी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -