घरताज्या घडामोडीअदानींनी भाजपला किती रुपये दिले?, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

अदानींनी भाजपला किती रुपये दिले?, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, आता राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. अदानींनी भाजपला किती रुपये दिले?, असा प्रश्न राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुकच्या माध्यमातून ५९ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींनी मोदींनी प्रश्न विचारला आहे. फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, पंतप्रधान जी, प्रश्न विचारून खूप दिवस झाले. तुम्ही अजून उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आज परत विचारतोय. हे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?, एलआयसी, एसबीआय, ईपीएफओमध्ये जमा असलेले लोकांचे पैसे अदानीला का दिले जात आहेत?, अदानींनी भाजपला किती रुपये दिले?, असं अनेक प्रश्न राहुल गांधींनी मोदींना विचारले आहेत.

- Advertisement -

अदानी मुद्यावरून राहुल गांधी केंद्र सरकारविरोधात सातत्याने आक्रमक होत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर राहुल गांधींनी संसदेत सरकारला घेरले. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीमुळे संसदेत गोंधळाचे वातावरण आहे.

- Advertisement -

हेही वाचा : जनतेला राहुल गांधींबद्दल सहानुभूती आहे, खासदारकीवरून शशी थरूर यांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -