घरदेश-विदेशराष्ट्रपती मुर्मूंबद्दल काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाकडून दखल

राष्ट्रपती मुर्मूंबद्दल काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाकडून दखल

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुर्मू यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावरून भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उदित राज यांनी जो शब्द वापरले आहेत, तो दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचे भाजपाने म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील उदित राज यांनी नोटीस बजावून माफी मागण्यास सांगितले आहे.

याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केल्याने भाजपाने आक्रमक होत त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. नंतर त्यांनी राष्ट्रपतींची माफी मागितल्यावर या वादावर पडदा पडला.

- Advertisement -

आता उदित राज यांनी राष्ट्रपतींबद्दल ट्वीट केले आहे. राष्ट्रपती म्हणतात 70 टक्के लोक गुजरातचे मीठ खातात. स्वतः मीठ खाऊन जीवन जगले तर कळेल. असा राष्ट्रपती कोणत्याही देशाला मिळू नये. ‘चमचेगिरी’ची हद्दच झाली, असे ट्वीट उदीत राज यांनी केले आहे. तसेच हे माझे खासगी वक्तव्य असून हे काँग्रेस पक्षाचे नाही. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा पूर्ण आदर आहे. त्या दलित-आदिवासींचीही प्रतिनिधी आहेत आणि त्यांना प्रश्न करण्याचा अधिकार आहे. त्याचा संबंध अध्यक्षपदाशी जोडला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुर्मू यांना उमेदवार बनवून आदिवासींच्या नावावर मते मागितली. राष्ट्रपती झाल्यानंतर त्या आदिवासी राहिल्या नाहीत का? त्या देशाच्या राष्ट्रपती असतील तर आदिवासींचा प्रतिनिधी देखील आहेत. जेव्हा लोक एससी-एसटीच्या नावाने पदावर जातात आणि मग गप्प बसतात तेव्हा खूप दु:ख होते, असे ते म्हणाले.

उदित राज यांच्या या या ट्वीटला भाजपा नेते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदित राज यांनी वापरलेला शब्द दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. यातून त्यांची आदिवासीविरोधी मानसिकता दिसते. ते काँग्रेसचे पहिलेच नेते नाहीत, यापूर्वी अनेकांनी देखील असे केले आहे. अधीर रंजन चौधरी यांनीही असे वक्तव्य केले होते आणि ते आम्ही ऐकले आहे, असे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले.

महिला आयोगाकडून दखल
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. देशाच्या सर्वोच्च शक्ती आणि आपल्या मेहनतीने या पदावर पोहोचलेल्या महिलेच्या विरोधात हे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे. उदित राज यांनी या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांना नोटिसा पाठवली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -