घरदेश-विदेशपंतप्रधानांना झुकवण्याची ताकद जगातील कोणत्याही देशात नाही; काँग्रेसचा सोरोस यांच्यावर हल्लाबोल

पंतप्रधानांना झुकवण्याची ताकद जगातील कोणत्याही देशात नाही; काँग्रेसचा सोरोस यांच्यावर हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी जहरी टीका केली, त्यांच्या या टीकेवर भाजपनंतर आता काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत जॉर्ज सोरोस यांना चांगलेच फटकारले आहे. जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा समावेश असलेल्या अदानी घोटाळ्यामुळे भारतात लोकशाही पुनरुत्थान सुरु होते की नाही हे सर्वस्वी काँग्रेस, विरोधी पक्ष आणि आमच्या निवडणुक प्रक्रियेकवर अवलंबून आहे.

- Advertisement -

जयराम रमेश पुढे म्हणाले की, अदानी प्रकरणाशी जॉर्ज सोरोस यांच्याशी काहीही संबंध नाही. आमचा नेहरूवादी वारसा हे सुनिश्चित करतो की, त्यांच्यासारखे लोक आमचे निवडणूक निकाल ठरवू शकत नाहीत. ते पूर्णपणे काँग्रेस, विरोधी पक्ष आणि आमची निवडणूक प्रक्रिया यावर अवलंबून आहे.

- Advertisement -

त्याचवेळी काँग्रेस नेते (नॅशनल मीडिया पॅनेलिस्ट, काँग्रेस) सुरेंद्र राजपूत यांनीही जॉर्ज सोरोस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुरेंद्र राजपूत म्हणाले की, स्मृती इराणी स्पष्टपणे ऐका, पंतप्रधान मोदींपुढे कोणी झुकते की नाही हे पाहणे भाजपचे काम आहे, पण पंतप्रधान मोदींना झुकवण्याची ताकद जगातील कोणत्याही देशाची नाही. भाजपने देशाच्या मागे लपून राहू नये.

सोरोस यांच्यासाठी भाजप पत्रकार परिषद का घेतयं?

दरम्यान शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील जॉर्ज सोरोस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, जॉर्ज सोरोस कोण आहे आणि ज्यांच्यासाठी भाजपचे ट्रोल मंत्रालय समर्पित एक पत्रकार परिषद का घेत आहे? मंत्री महोदय, भारताच्या निवडणूक प्रक्रियेत इस्रायली एजन्सीच्या हस्तक्षेपावर काही भाष्य? भारताच्या लोकशाहीला हा मोठा धोका आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले होते. यानंतर भाजपनेही जॉर्ज सोरोस यांच्यावर हल्लाबोल केला. यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, जॉर्ज सोरोस सारख्या लोकांना कमकुवत सरकार असलेला कमकुवत देश हवा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तो चालवायचा आहे, पण हा नवा भारत आहे.


बोरिवलीत केंद्रीय दूरसंचार विभागाच्या जागेवर कारवाई, एकाच दिवसात हटवली ५५ बांधकामे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -