Live Update : महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये मेडिकलच्या १९७ जागा वाढल्या

maharashtra politics cm eknath shinde aurangabad visit pm modi Union Budget 2023

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये मेडिकलच्या १९७ जागा वाढल्या

धाराशिव (उस्मानाबाद)मध्ये १५ जागा वाढल्या


राज्य उत्पादन शुल्क घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री सिसोदियांची सीबीआयकडून 9 तास चौकशी


राज्यात पुढील २ दिवस पावसाचा इशारा


चांगल्या वर्तणुकीमुळे बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची मुक्तता – गुजरात सरकार

चांगली वर्तणूक असल्यामुळे बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची मुक्तता केल्याचे गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचा भाग म्हणून कैद्यांना सूट देण्याच्या परिपत्रकानुसार या दोषींची मुक्ता करण्यात आलेली नसल्याचेही गुजरात सरकारने स्पष्ट केले.


खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात, याप्रकरणी पोलिसांना पत्र


नागपुरात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीशपदी नियुक्ती , चंद्रचूड 50 वे सरन्यायाधीश असतील. धनंजय चंद्रचूड 9 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारतील . त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.


नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर काँग्रेसचा विजय, अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे यांचा विजय झाला. त्यांना 39 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या कुंदा राऊत यांचा विजय झाला.


अंधेरीत निवडून येण्याची आम्हाला पूर्ण खात्री होती – देवेंद्र फडणवीस


ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मोठा पक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्याने भाजप कार्यकर्ते नाराज – देवेंद्र फडणवीस


राज ठाकरे आणि शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली – फडणवीस


आम्ही हवेत दावे करत नाही – ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भांत देवेंद्र फडणवीसांचं विधान


कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, अंधेरी पोटनिवडणुकीबाबतच्या भाजपच्या निर्णयावर  शरद पवारांची प्रतिक्रिया


पाठिंबा देणाऱ्यांची मी ऋणी राहिन- ऋतुजा लटके


भाजपला अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसल्याने उमेदवार मागे घेतला- सुषमा अंधारे


अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने वैयक्तिक सर्वे केला होता – संजय राऊत


भाजपचे मुरजी पटेल यांची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार,


आरोग्य मंत्री तानाजी सावंत राज ठाकरेंच्या भेटीला


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज CBI चौकशी


सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक , अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चेची शक्यता


पुण्याच्या डेक्कन जिमखान्यातील चॅम्पियन स्पोटर्सच्या दुकानाला आग


काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान, खर्गे आणि थरुर यांच्यात चुरशीची लढत


मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, दोन दिवस अनेक भागात यलो अलर्ट


राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा आज निकाल