घरदिवाळी २०२१नरक चतुर्दशीच्या दिवशी घरामध्ये लावा 14 दिवे; मिळेल सुख-समृद्धी

नरक चतुर्दशीच्या दिवशी घरामध्ये लावा 14 दिवे; मिळेल सुख-समृद्धी

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असं म्हटलं जातं की, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासूराचा वध करुन त्याच्या तावडीतून 16 हजार स्त्रियांना मुक्त केले होते. त्यामुळे हे दिवे आनंद साजरा करण्यासाठी लावले जातात. तसेच नरक चतुर्दशीच्या दिवशी यमदेवांसाठी देखील दीवा लावला जातो.

- Advertisement -

शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी अनेकजण 5 दिवे लावतात. ज्यातील एक घरामध्ये, दुसरा स्वयंपाक घरात, तिसरा पिण्याचे पाणी असते. त्याठिकाणी, चौथा मुख्य दाराबाहेर, पाचवा तुळशीजवळ लावला जातो. परंतु तुम्ही या दिवशी 5 दिव्याऐवजी 7,13 किंवा 14 दिवे देखील लावू शकता.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अशाप्रकारे ठेवा दिवे

- Advertisement -

  • या दिवशी संध्याकाळी पहिला दिवा राईच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करुन लावा. हा दिवा यमासाठी असतो.
  • दुसरा तूपाचा दिवा एखाद्या मंदिरामध्ये लावायला हवा. असं केल्यास कर्ज मुक्ति होते.
  • शास्त्रानुसार, तिसरा दिवा देवी लक्ष्मींसमोर लावावा.
  • चौथा मुख्य दाराबाहेर लावा.
  • पाचवा तुळशीजवळ लावा.
  • सहावा पिंपळाच्या झाडाखाली लावा.
  • सातवा घरातील बाथरुममध्ये लावा.
  • आठवा दिवा स्वयंपाक घरामध्ये लावा.
  • नववा दिवा घरातील पायऱ्यांवर ठेवा.
  • दहावा दिवा वडाच्या झाडाखाली लावा.
  • उरलेले सर्व दिवे घरातील सर्व खोल्यांमध्ये लावा.

हेही वाचा :

लक्ष्मीपूजन करताना देवी लक्ष्मीची कशा प्रकारची मूर्ती वापरावी? जाणून घ्या शास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -