घरदेश-विदेश'लिव्ह इन'मधील शरीरसंबध बलात्कार नव्हे - सर्वोच्च न्यायालय

‘लिव्ह इन’मधील शरीरसंबध बलात्कार नव्हे – सर्वोच्च न्यायालय

Subscribe

'लिव्ह इन'मध्ये राहात असलेल्यांमध्ये झालेले शरीर संबधांना बलात्कार म्हणून बघितले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पुरुषाने लग्नास नकार दिला तरीही त्यांना बलात्कार म्हटले जाणार नसल्याचे

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या जोडीदाराबरोबर शरीर संबध ठेवल्यास त्याला भविष्यात बलात्कार म्हणता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लिव्ह इन मध्ये राहात असताना संम्मतीने झालेले शरीरसंबध हे खाजगी वादामुळे शिक्षा देण्याचे कारण ठरु शकनार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. या निर्णयामुळे लिव्ह इन मध्ये राहाणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील एका महिलेने एका डॉक्टर विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लिव्ह इन मध्ये राहात असताना डॉक्टरांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. संबधित महिला ही परिचारिका असून तिने डॉक्टरविरोधात तक्रार केली होती. ही तक्रारही रद्द करण्यात आली आहे.

काय आहे प्रकार

महाराष्ट्रातील एका महिलेने डॉक्टरविरोधात बाल्ताकाराचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. पीच्या निधनांनंतर ती एका डॉक्टरकडे काम करु लागली. डॉक्टर आणि तिच्यात प्रेमसंबध निर्माण झाले आणि हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दरम्यानच्या काळात दोघांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि महिनेले डॉक्टरविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी डॉक्टराच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्या. ए के सिकरी आणि एस अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

- Advertisement -

दाखवले लग्नाचे आमिष

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच या याचिकेवर निकाल दिला आहे. ‘बलात्कार आणि संमतीने शरीरसंबंध यात फरत असतो. अशा प्रकरणात सखोल चौकशी आवश्यक असते. आरोपी खरंच पीडितेशी लग्न करण्यास तयार होता किंवा त्याचा काही दुसराच होता आणि त्याने वासना शमवण्यासाठी लग्नाचे खोटे आमिष दाखवले हा गुन्हा फसवणूकीच्या अंतर्गत येत असल्याचे न्यायाधिशांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -