घरट्रेंडिंगVideo - ...आणि ७१ वर्षाच्या आजोबांना पोलिसांनी दिलं सरप्राईझ!

Video – …आणि ७१ वर्षाच्या आजोबांना पोलिसांनी दिलं सरप्राईझ!

Subscribe

या व्हिडीओमध्ये दिसणारे आजोबा ७१ वर्षांचे आहेत. त्यांची मुलं परदेशात राहतात. लॉकडाउनमुळे ते तिथेच अडकले आहेत.

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असतात. काही व्हीडिओ पोट धरून हसवतात तर काही व्हीडिओ बघून डोळ्यात टचकन पाणी येतं. असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काही जण एकटेच घरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर दिसतायत ते फक्त पोलिस. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मदतीला पोलिसच धावून गेलेले अनेकवेळा आपण बघितलं आहे. या व्हीडीओतही एका आजोबांचा वाढदिवस चक्क पोलिसांनी साजरा केल्याचे दिसत आहे. हा व्हीडिओ अभिनेत्री रविना टंडन आणि तापसी पन्नूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये दिसणारे आजोबा ७१ वर्षांचे आहेत. त्यांची मुलं परदेशात राहतात. लॉकडाउनमुळे ते तिथेच अडकले आहेत. सध्या हे आजोबा आपल्या घरात एकटेच राहतात. आपल्या वाढदिवशी त्यांना कुटुंबियांची खूप आठवण येत होती. परंतु या नाराज आजोबांचा वाढदिवस साजरा करुन पोलिसांनी त्यांना खुश केलं.

आजोबांना अश्रू अनावर

आजोबा आपल्या बंगल्याच्या गार्डनमध्ये काही तरी काम करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना काहीतरी बहाणा करून गेटजवळ बोलवलं. त्यांना काही प्रश्न विचारले आणि आजोबा उत्तर देत असतानाच पोलिसांनी त्यांच्यासमोर केक धरला. आजोबांना एकदम आश्चर्यच वाटले. लॉकडाउनच्या काळात दिवसरात्र एक करुन जागता पाहारा देणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याबाबत व्यक्त केलेले प्रेम पाहून आजोबा भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहात होते.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल

रविना आणि तापसी पन्नूने शेअर केलेल्या या व्हीडिओत नेटकऱ्यांनी मस्त प्रतिसाद दिला आहे. या  व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत.


हे ही वाचा – सामान्य चेहर्‍याचा असामान्य कलाकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -