घरताज्या घडामोडीLive Update: जम्मू काश्मीरमध्ये बांगीपोरा पोलिसांनी केला दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश

Live Update: जम्मू काश्मीरमध्ये बांगीपोरा पोलिसांनी केला दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश

Subscribe

 

बांगीपोरा पोलिसांनी केला दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश. एलईटीच्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून शस्त्र, दारुगोळा आणि इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -


मुंबईत मागील २४ तासात १०,६६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११ रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज २१,४७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

- Advertisement -


 

विराट कोहलीने कसोटी संघाची कॅप्टनशीप सोडली, विराटने ट्विट करत ही माहिती दिली आहे.


पुणे पिंपरीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात – अजित पवार


राज्यातील काही जिल्ह्यात लसीचा तुटवडा – अजित पवार


निवडणूक आयोगाकडून २२ जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली आणि रोड शोवर घातली बंदी


खारेगाव पूल उद्घाटनाच्या श्रेयवादावरून ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहे. यावेळी जोरदार घोषणा, पोस्टरबाजी सुरू आहे.


पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता सोनू सूदची बहीण मालिका सूद यांना मोगामधून उमेदवारी मिळाली आहे. तर अमृतसर पूर्वमधून नवज्योतसिंग सिद्धू लढणार आहेत.


दिगंबर दुर्गाडे हे पुणे जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष, तर सुनील चांदेरे पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जाहीर


अभिनेता किरण मानेंनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. किरण मानेंबाबत वादावर शरद पवार यांच्या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरातून लढवणार आहेत.


दिल्लीत ओमिक्रॉनचे कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचा पुरावा लवकरच मिळणार असल्याचे समोर आले आहे.


थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार सभांवरील बंदी उठवणार की काय राहणार? याबाबतचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे.


वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आढावा बैठक घेणार आहे. माहितीनुसार आज दुपारी ४ वाजता अजित पवार कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.


देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६८ हजार ८३३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे देशातील पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच २४ तासांत ४०२ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण बरे होऊन घरी आहेत. सविस्तर वाचा 


तामिळनाडूतील मदुराईच्या पालेमेडू परिसरात जल्लीकट्टू स्पर्धा सुरू झाली, पाहा व्हिडिओ


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्टार्टअप उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत. स्टार्टअप्स ग्रोइंग फ्रॉम रूट्ससह सहा थीमवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करतील


अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षा रद्द झाल्यामुळे शुल्क परत मिळणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण संचलनायलयाने निर्णय घेतला आहे. ३५ रुपये प्रक्रिय फी वगळता १४३ रुपयांचा परतावा मिळणार आहे.


राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षांसाठी ऑनलाीन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी आता ३१ जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -