घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

Live Update: मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

Subscribe

मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


यशवंत जाधव प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाची नोटीस

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रकरणातील नंदकिशोरी चतुर्वेदींविरुद्ध ईडीची लवकरच कोर्टात धाव


ई़डीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, ईडीच्या जप्तीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार.

- Advertisement -

दिशा सालियनची आत्महती नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे. लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे पेनड्राईव्हद्वारे देणार.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर ईडीचा रिप्लाय आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. देशमुखांच्या जामीन अर्जावर ८ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३६ कोटींची संपत्ती जप्त

NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई


कोकणात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता


चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी नेपाळ येथील काठमांडूमध्ये ३ वाजता पोहोचतील


चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी अजित डोवाल यांच्या कार्यालयात पोहोचले


देशात गेल्या २४ तासांत १ हजार ६८५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ८३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ४९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात २१ हजार ५३० सक्रीय रुग्ण आहेत.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात देशमुखांचा जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.


चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आज भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर, NSA डोवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत.


आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -