घरदेश-विदेशकोरोनाचा कहर! गेल्या २४ तासात २ लाख ७३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासात २ लाख ७३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून कोरोना मृतांची संख्या एक हजारहून अधिक झाली आहे.

देशात कोरोना विषाणूने कहर केला असून रुग्णसंख्येने आता दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून कोरोना मृतांची संख्या एक हजारहून अधिक झाली आहे. गेल्या चोविस तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९३ हजार ५२८ वर पोहचली आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १०३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ चा टप्पा पार केला आहे.

आत्तापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ कोरोनाचे अॅटिव्ह रुग्ण आहेत. देशात आत्तापर्यंत १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -