घरCORONA UPDATECorona Update : अरे व्वा! कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी 'म्युझिक थेरपी'चा वापर, हॉस्पिटलचा...

Corona Update : अरे व्वा! कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी ‘म्युझिक थेरपी’चा वापर, हॉस्पिटलचा भन्नाट प्रयोग

Subscribe

अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलने आपल्या रुग्णांसाठी वेगळा उपक्रम सुरु केला आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मात्र, असे असले तरी देशभरातील रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांची जास्तीजास्त काळजी घेण्याचा, त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न करत आहे. हे रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत आणि या काळात त्यांना निराशा येऊ नये यासाठी रुग्णालयांचा प्रयत्न आहे. बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून व्यायाम करून घेतला जातो. मात्र, अहमदाबाद येथील एका रुग्णालयाने आपल्या रुग्णांसाठी वेगळा उपक्रम सुरु केला आहे. अहमदाबादच्या सोला सिव्हिल रुग्णालयात रूग्णांच्या उपचारासाठी व्यायामासोबतच म्युझिक थेरपीचा वापर केला जात आहे.

रुग्णांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न

सोला सिव्हिल रुग्णालयात आधी केवळ रुटीन फिजिओथेरपीसाठी लोक येत होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आम्ही रुग्णांना आयसोलेशन वॉर्ड उपलब्ध करून दिले. कोरोनाबाधित रुग्ण हे थोडे चिंतेत, थोडे निराशा असल्याचे आम्हाला लक्षात आले. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्यासोबतच त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही म्युझिक थेरपीला सुरुवात केली, असे या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -