घरट्रेंडिंगCoronavirus: करोनाच्या धास्तीने लोकांची ऑनलाईन व्यवहाराला पसंती

Coronavirus: करोनाच्या धास्तीने लोकांची ऑनलाईन व्यवहाराला पसंती

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चलनी नोटांचा वापर करायला लोक घाबरत आहेत.

देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाचा धसका घेत लोकांनी चलनी नोटांचा वापर कमी करत ऑनलाईन व्यवहाराला पंसती दिली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक घरुन काम करत आहेत. घरातून बाहेर जायला तसेच चलनी नोटांचा वापर करायला लोक घाबरत आहेत. यामुळे ऑनलाईन व्यवहारामध्ये वाढ झाली आहे, असे पेटीएमने म्हटले आहे.

एवढ्या टक्क्यांनी वाढला ऑनलाईन व्यवहार

करोनाच्या धास्तीने लोकांनी ऑनलाईन व्यवहाराला पसंती दिली आहे. नियमित दिवसांच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहारामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीपासून पेटीएम अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असे पेटीएमच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास लोकांनी ऑनलाईन व्यवहार करावा, असे आवाहन केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती

देशात सध्या १३७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर ३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात जास्त ४२ करोनाबाधित आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -