घरCORONA UPDATEसलाम! वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्याऐवजी 'त्या' डॉक्टराने केली कोरोना रूग्णाची सेवा!

सलाम! वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्याऐवजी ‘त्या’ डॉक्टराने केली कोरोना रूग्णाची सेवा!

Subscribe

मलकानगिरीपासून महापात्रा यांचे गाव ७०० किलोमीटर दूर आहे. गावी जावून लवकरात लवकर परत कोरोनाग्रस्तांची सेवा करायला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी गावी न जाता रूग्णांची सेवा केली.

संपूर्ण जग कोरोनासी लढत आहेत. जगभरात एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठे मोठे प्रतिभाशाली देश कोरोनाशी लढा देऊन थकले आहे. आज हजारो डॉक्टर कोरोनाशी सामना करण्यासाठी लढत आहेत. दररोज कोरोनाचा रूग्ण बरा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अनेकवेळा डॉक्टरच कोरोनाची शिकार झाल्याची अनेक उदाहरणं सध्या समोर आली आहेत. तरी डॉक्टरांनी आपली रूग्णसेवा थांबवलेली नाही. दिवस रात्र ते रूग्णसेवा करत आहेत. अनेक डॉक्टर महिना झाला घरी देखील गेले नाहीयेत.

ओडिशातील मलकानगिरीमध्ये डॉक्टरांनी नात्यापेक्षा आपल्या ड्युटीला जास्त महत्त्व दिलं आहे. मलकानगरिमधील डॉक्टर शशी बूषण महापात्र यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र डॉक्टरांनी वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्याऐवजी जिल्हा हॉस्पिटलमध्ये कोरोनारूग्णाची सेवा केली. वडिलांच्या मृत्यूची बातमी डॉक्टर शशी भूषण यांना फोनवरून सांगण्यात आली होती. शुक्रवारी डॉक्टरांच्या वडिलांच निधन झालं. खरतर घरातील जबाबदार मुलगा म्हणून डॉक्टरांनी वडिलांना मुखाग्नी द्यायला आपल्या गावी जाणं अपेक्षीत होतं. मात्र देशात कोरोनाचं वाढतं संकट बघता डॉक्टर महापात्रा यांनी वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी गावी जाण्याऐवजी कोरोना रूग्णाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मलकानगिरीपासून महापात्रा यांचे गाव ७०० किलोमीटर दूर आहे. गावी जावून लवकरात लवकर परत कोरोनाग्रस्तांची सेवा करायला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी गावी न जाता रूग्णांची सेवा केली. डॉक्टर महापात्र यांच्या या निर्णयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील महापात्रा यांच्या या निर्णयाची स्तुती केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट देखील केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -