घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, १७० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू


Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात ६३५ कोरोनाबाधितांची नोंद, तर १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

देशात विरोधी पक्षाचा चेहरा आणि मोदींविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावर शरद पवार यांनी देशातील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. तसेच प्रशांत किशोर आणि माझी भेट एका कंपनीविषयी चर्चा करण्यासाठी झाली असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपण पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत उमेदवार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता, राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता, राज्यातील सार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार


आरोग्य, वैद्यकीय विभागात १५ हजार ५११ पदांवर मेगा भरती, दत्ता भरणे यांची घोषणा


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता देशमुख यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.


राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली.


थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार


भाजप नेते पियुष गोयल यांना राज्यसभेचे सभागृह नेतेपद देण्यात आले.


मुंबई पालिकेची २०२२च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई पालिकेनं बुथची संख्या वाढवली आहे. गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त ४ हजार बूथ वाढवले आहे. आता मुंबईत १२ हजार बूथ राहणार आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ७९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६२४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१ हजार रुग्ण बरे होईन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ९ लाख ४६ हजार ७४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ११ हजार ४०८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १ लाख ४ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख २९ हजार ९४६ जणांवर उपचार सुरू आहेत.


मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन भागात पाणी साचले.


आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील लोकल आणि संध्याकाळपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.


कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार सुरू आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या तुडूंब भरून वाहत आहे असून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावं पाण्याखाली गेली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड,रत्नागिरी,सातारा,कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आहे. तर पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. दिल्लीत २४ तासांत ७६ नवे रुग्ण आढळले असून २ जणांच्या मृत्यू झाल्याचे समोर आहे. सध्या ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनामुळे २५ हजार २० जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख ३५ हजार २०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १८ कोटी ८५ लाख ७७ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत ४० लाख ६५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी २४ लाख ६ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -