घरताज्या घडामोडीकोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात १ लाख ५२ हजारांहून अधिक नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची...

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! देशात १ लाख ५२ हजारांहून अधिक नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Subscribe

देशात प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक झाल्याचे चित्र समोर येत आहे. देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनके राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला असला तरी देखील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. शनिवारी देशात १ लाख ४५ हजार ३४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर आज १ लाख ५२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने हा आकडा वाढून बाधितांचा एकूण आकडा १ कोटी ३३ लाख ५८ हजारांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना सध्या देशात सध्या ११ लाख ८ हजार ०८७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर देशात १० कोटी १५ लाख ९५ हजार १४७ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमधील एका दिवसांत सर्वाधिक बाधितांची आज नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यासह शनिवारी राज्यात दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित आढळून असून ३०९ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाला हरवून बरे झाल्याची माहिती मिळतेय.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -