Corona Live Update: करोनाची लागण झालेल्या माजी भारतीय क्रिकेटपटूची तब्येत खालावली

गेल्या २४ तासांत तब्बल ६५ हजार २ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

नवनीत राणांचा लीलावती रुग्णालयातून व्हिडिओ संदेश!

खासदार नवनीत राणा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सगळ्यांचीच चिंता वाढली होती. विशेषत: त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. त्यात त्यांना ICU मध्ये ठेवल्याचं समजल्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आता नवनीत राणा आयसीयूमधून बाहेर आल्या असून त्यांना General Ward मध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांनी स्वत: त्यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. रुग्णालयात बेडवर झोपलेल्या असतानाच त्यांनी हा व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये ‘आपली प्रकृती चांगली असून लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन’ असं त्या म्हणत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडल्याचं बोललं जात आहे. (सविस्तर वाचा)


‘या’ भारतीय क्रिकेटपटूची तब्येत खालावली

कोरोना विषाणूची लागण झालेल्या भारतीय संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली आहे. चेतन यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यांना आता व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. (सविस्तर वाचा)


सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्याचे सहकार मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याचे समजते. काल त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून हा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळासाहेब पाटली यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आजची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६५ हजार २ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.