घरदेश-विदेशCorona Vaccine: लवकरच रशियानंतर ऑक्सफोर्डची विश्वसनीय लस तयार होणार!

Corona Vaccine: लवकरच रशियानंतर ऑक्सफोर्डची विश्वसनीय लस तयार होणार!

Subscribe

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि जर्मनीची कोरोना लस या वर्षाच्या अखेरीस तयार होऊ शकेल असे ब्रिटनच्या लसीकरण टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले आहे.

रशियाकडून कोरोनावरील यशस्वी लस जाहीर झाल्यानंतर आता इतर देशांकडूनही लस तयार होण्याची बातमी लवकरच येऊ शकते. काही महिन्यांत ऑक्सफोर्डच्या कोरोना विषाणूची लस लवकरच तयार केली जाऊ शकते. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि जर्मनीची कोरोना लस या वर्षाच्या अखेरीस तयार होऊ शकेल, असे ब्रिटनच्या लसीकरण टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले आहे.

तसेच, केट बिंघम म्हणाले की ब्रिटनमधील जवळपास एक लाख लोक या लसीच्या चाचणीत सहभाग घेण्यासाठी पुढे आले आहेत. तर केट यांनी स्काई न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अधिक स्वयंसेवकांना या चाचणीत सामील होण्यासाठी आवाहन देखील केले आहे.

- Advertisement -

केट बिंघम यांनी असे सांगितले की, ‘मला वाटते की यावर्षी ही लस तयार होईल. या दोन लसींमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता आहे, एक ऑक्सफोर्ड विद्यापीठात तयार केली जात आहे आणि दुसरी लस जर्मन कंपनी बायोटेक यांनी विकसित केली आहे.

तर दुसरीकडे अमेरिकन औषध कंपन्या देखील बर्‍याच लसांवर वाढत्या प्रमाणात काम करत आहेत. अमेरिकन कंपनी Novavax ने असे जाहीर केले की, या लसीची चाचणी दक्षिण आफ्रिकेत करत आहेत. NVX-CoV2373 या लसीच्या पुढील टप्प्यात-२ बी चाचणी सुमारे २६६५ निरोगी लोकांवर करण्यात येणार आहे. यासह चीनने CanSino Biologics Inc या कंपनीच्या कोरोना लसच्या पेटंटला मान्यता दिली आहे. ही कंपनी रशिया, ब्राझील, मेक्सिको, सौदी अरेबियासह अनेक देशांमध्ये चाचण्या सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.


Corona Vaccine: चीनी कंपनीनं मिळवलं कोरोना वॅक्सीनचं पहिलं पेटेंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -