घरट्रेंडिंगकरोना व्हायरसचं नाव सांगून तिने नराधमाला पळवून लावलं!

करोना व्हायरसचं नाव सांगून तिने नराधमाला पळवून लावलं!

Subscribe

चीनमध्ये सध्या करोना व्हायरसने गंभीर रूप धारण केलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: चीनच्या वुहान प्रांतात करोना व्हायरलचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत जगभरात करोना व्हायरसमुळे ४२७ लोकांचा जीव गेला असून २० हजार ७००हून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य परिषदेने देखील या व्हायरसला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सगळेच धास्तावले असताना एका तरुणीने मात्र करोना व्हायरसमुळे स्वत:चा बचाव करून घेतला आहे. चीनच्या जिंगशान भागामध्ये ही घटना घडली आहे.

ती म्हणाली, ‘मला करोना व्हायरसची लागण झालीये’

यी नावाची तरूणी आपल्या घरी एकटीच असताना एक अज्ञात व्यक्ती तिच्या घरात शिरला. त्याने परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचं तोंड त्यानं दाबलं. पण तेवढ्यात ही तरूणी अचानक खोकण्याचं नाटक लागली. आपल्यावर ओढवलेल्या संकटात प्रसंगावधान राखून तिने त्याला सांगितलं की ‘मी नुकतीच वुहानमधून परतले आहे आणि मला करोना व्हायरसची लागण झालेली आहे’. हे ऐकताच त्या व्यक्तीचा चेहरा पांढरा पडला. भितीने घाबरून त्या व्यक्तीने तिला सोडून दिलं आणि पळ काढला.

- Advertisement -

यानंतर यीने पोलिसांना कळवलं. जाताना या भामट्याने यीकडचे ३३८ डॉलर धमकावून काढून नेले. दरम्यान, यीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, या काळाच सगळेच तोंडावर मास्क लावून फिरत असल्यामुळे गुन्हेगाराचा शोध घेणं कठीण होतं. पण काही काळानंतर झियाओ नावाची ही व्यक्ती स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाली.


हेही वाचा – चिकनमध्ये करोना ही अफवा, तज्ज्ञ डॉक्टरांचं मत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -