घरताज्या घडामोडीCoronaVirus: तबलीगीच्या कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या कोरोना रुग्णामुळे १४ गावं सील!

CoronaVirus: तबलीगीच्या कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या कोरोना रुग्णामुळे १४ गावं सील!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. ते ठिकाण सील केले जात आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे जिल्हाप्रशासनाने १४ गावं सील केले आहेत. हा कोरोनाबाधित व्यक्ती आंध्र प्रदेशातील असून तो भवानीपूर खली परिसरातील एका मशिदीत राहत होता, असी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. शनिवारी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाला आला.

या व्यक्ती गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलीग जमात कार्यक्रमात गेला होता, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती राहत असलेल्या गावापासून तीन किलोमीटर असलेल्या १४ गावं सील करण्यात आली आहेत. तसंच या १४ गावांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थनेने जिल्हा न्यायदंडाधिकारी कुमार प्रशांत यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान सोमवारी उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये आणखीन ३० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३४ वर पोहोचली आहे. त्यापैकी ६० जण हे तबलीग जमातचे आहेत, असं जिल्हाधिकारी प्रभु एन सिंह यांनी सांगितलं. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८३ कोरोनाचे रुग्णांची संख्या असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ४६ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: महिलांनी प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून, पिशव्या भिरकावल्या इतरांच्या घरात!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -