कोरोनाचा अंत आला जवळ, सर्वांनी प्रयत्न केल्यास…; WHO च्या प्रमुखांचे मोठे वक्तव्य

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मागील 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आलेख इतका घसरल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी माहिती दिली.

Coronavirus update who advises against use of two antibody drugs sotrovimab and casirimab imdevimab

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मागील 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आलेख इतका घसरल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी माहिती दिली. जिनिव्हा येथे झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत त्यांना सध्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देत कोरोनाचा अंत जवळ आल्याचे म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. (covid 19 pandemic WHO chief tedros adhanom ghebreyesus)

कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. पण सध्याच्या परिस्थितीत त्याचा अंत दृष्टीक्षेपात दिसतो आहे. कारण, जगभरातील सध्याची कोरोनाची स्थिती आधीपेक्षा चांगली आहे. पण भविष्यात कोरोनाचे नवे व्हेरियंट आपल्यावर धोका वाढू शकतो, असे टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी म्हटले.

“मॅरेथॉनमध्ये धावपटू विजयाची रेष दिसल्यानंतर जिंकण्यासाठी वेगाने धावतात. पूर्ण ताकदीनं धावत असून, थांबत नाहीत. या धावपटुंप्रमाणे आपल्यालाही थांबयाचे नाही. कोरोनाच्या शेवटाची रेषा आपल्याला दिसते आहे. त्यामुळे विजयासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील. कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही, पण तिचा अंत जवळ आला आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करायला हवे. जगभरातील सर्व देशांनी सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेतल पाहिजे. मात्र, तसे न केल्यास सध्याच्या परिस्थितीचा फायदा करुन घेतला नाही, तर नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता आहे”, असे गेब्रेयसस यांनी म्हटले.

जगभरात कोरोना महामारीमुळे 60 ते 65 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 3 वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकुळ घातला आहे. पण सध्याची जगभरातील कोरोनाची स्थिती आधीपेक्षा चांगली आहे. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच गेल्या आठवड्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना मृत्यूमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी घट आली आहे. दरम्यान, जगभरात आतापर्यंत 616, 154, 218 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

चीनमधून उदयास आलेल्या या व्हायरसमुळे 6,525,964 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत 595, 318, 378 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. तसचे कोरोना संक्रमणाची स्थितीही गंभीर वाटत नाही.


हेही वाचा – पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध