घरताज्या घडामोडीLive Update: एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

Live Update: एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

Subscribe

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

३१ डिसेंबरला पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेची परवानगी पुणे पालिसांकडून नाकारण्यात आली आहे.

- Advertisement -

कंगनाला न्यायालयाकडून आणखी एक दणका

कंगनाच्या खार दिंडोशा येथील घरात केलेले वाढीव बांधकाम हे अनधिकृत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता  कंगनाला न्यायालयाकडून आणखी एक दणका बसला आहे. (सविस्तर वाचा )

- Advertisement -

शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी – केंद्रीय कृषीमंत्री

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात थेट निधी देण्यात आला असल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दुसऱ्यांदा विहंग सरनाईक यांच्या ईडी चौकशी होणार आहे.


कंटेन्मेंट झोनमध्ये जलक्रिडा, नौकानयन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पर्यटनस्थळी मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पुर्वेश आज ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. माहितीनुसार विहंग यांना ईडीने सहावा समन्स बजावला आहे.


राष्ट्रवादीची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पराभूत झालेल्या उमेदरावांची बैठक होणार आहे. प्रदेशध्यक्षांसह मंत्री उपस्थित राहणार आहेत.


देशात गेल्या २४ तासांत २३ हजार ९५० रुग्ण आढळले असून ३३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २६ हजार ८९५ रुग्ण २४ तासांत कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९९ हजार ६६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४६ हजार ४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९६ लाख ६३ हजार ३८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ लाख ८९ हजार २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


२३ डिसेंबरपर्यंत देशात १६ कोटी ४२ लाख ६८ हजार ७२१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख ९८ हजार १६४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली.


जानेवारी-फेब्रुवारीत सीबीएसईची परीक्षा नाही. सीबीएसई परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.


जगात अद्यापही कोरोनाचा कहर आहे. आता ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना व्हायरस आढळला आहे. त्यामुळे सध्या इतर देश चितेंत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत ७ कोटी ८३ लाख ३९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत १७ लाख २२ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले असून ५ कोटी ५१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -