घरमनोरंजनOops Moment: अन् शॉर्ट ड्रेसने जॅकलिनची केली फजिती, बघा व्हिडिओ

Oops Moment: अन् शॉर्ट ड्रेसने जॅकलिनची केली फजिती, बघा व्हिडिओ

Subscribe

व्यायाम करताना घातला शॉर्ट ड्रेस अन् झाली पंचायत

सध्याच्या डिजिटल युगात जगत असताना कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यास काही क्षणांचा अवधी पुरेसा असतो. दरम्यान सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच चर्चेत आहे. अभिनयापेक्षा सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी जॅकलिन ही एक आहे. सध्या तिचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जॅकलिन व्यायाम करताना दिसतेय. यामध्ये ती एका शॉर्ट ड्रेसमध्ये व्यायाम करताना दिसतेय. मात्र यावेळी तिची चांगलीच फजिती झाली असून ती Oops Moment ची शिकार झाल्याचे पाहायला मिळते.

- Advertisement -

असा आहे जॅकलिनचा व्हिडिओ…

जॅकलिन शॉर्ट ड्रेस घालून व्यायाम करत आहे असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्यायाम करताना शॉर्ट कपड्यामुळे तिला काहीशी अडचण होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.  दरम्यान हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काहींना या व्हिडिओमध्ये काही गैर वाटत नाही तर काहींनी या व्हिडिओमुळे जॅकलिनवर टीका केली आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी सध्या तो पुन्हा व्हायरल होत आहे.

- Advertisement -

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती भूत पोलीस, बच्चन पांडे, किक २ यासारख्या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या आगामी चित्रपटामध्येही ती काम करणार आहे. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग या आणि पुढच्या वर्षात पूर्ण होणार असल्याचीही माहिती मिळतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -