घरCORONA UPDATEcovid cases in india : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, 24 तासात...

covid cases in india : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, 24 तासात 2 लाख 64 हजार नवे रुग्ण

Subscribe

याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना कोरोनाविरोधात तयारी करण्याचे निर्देश दिले तसेच लसीकरण मोहिमेवर चर्चा केली.

भारतात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा धडकी भरवणारा वेग पाहायला मिळाला. गेल्या 24 तासात देशात 2,64,202 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 6.7 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाचा दर आता 14.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही 5,753 नोंदवण्यात आली आहे. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या तुलनेत देशात आज 16,785 अधिक रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी देशात कोरोना रुग्णांची संख्या ही 2,47,417 इतकी होती. तर आज हीच संख्या 2,64,202 वर पोहचली आहे. यात 1,09,345 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12,72,073 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 219 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 4,85,350 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रासह दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

गेल्या 24 तासात महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्रात 46,406 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 28,867 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ कर्नाटक 25,005, बंगाल 23,467 आणि तामिळनाडू 20,911 रुग्ण आढळले आहेत. एकूण नवीन रुग्णांपैकी 54.74 टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. तर यातील महाराष्ट्रात 17.56 टक्के रुग्ण आहेत.

- Advertisement -

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणही वेगाने सुरू आहे. गेल्या 24 तासात 73,08,669 कोरोनाविरोधी लस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 1,55,39,81,819 कोरोना लस देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात देशात 17,87,457 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी सर्व मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना कोरोनाविरोधात तयारी करण्याचे निर्देश दिले तसेच लसीकरण मोहिमेवर चर्चा केली.


Covid-19 Treatments : कोरोनावर आता दोन नव्या पद्धतीने होणार उपचार; WHO ने दिली मान्यता


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -