घरदेश-विदेशकोरोनाचा विळखा सोडवणारे 'फील्ड हॉस्पिटल' नेमके कसे आहे?

कोरोनाचा विळखा सोडवणारे ‘फील्ड हॉस्पिटल’ नेमके कसे आहे?

Subscribe

कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यातील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक आरोग्य सेवांचा तुवटडा निर्माण झाला आहे. काही ठरावीक राज्यांमध्ये फक्त रुग्णांना त्वरीत उपचार देण्यात यश येत नाही. देशातील कोरोना विषाणूचे संकट कमी करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. दरम्यान सध्या सुरु असलेल्या उपायोजनांमध्ये काही नवीन सुचना किंवा पर्याय पुढे येत आहेत. यात काही तज्ज्ञांच्या मते, भारतात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी फील्ड हॉस्पिटल महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकते.

देशात सध्या कोरोना रुग्णांमुळे आधीच गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांबरोबर स्वतंत्र्य कोरोना वॉर्ड तयार करुन तेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे सामान्य गंभीर रुग्णांनाही कोरोनाचा अधिक धोका निर्माण होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे इतर गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या रुग्नांना वेळीच उपचार मिळण्यात अडचणी येत आहे. यामुळे अशा गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांची प्रतिकारशक्ती आधीच कमकुवत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास अधिक धोका निर्माण होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताने फील्ड रुग्णालयांचा पर्याय निवडायला हवा. फील्ड रुग्णालय लवकर तयार केली जाऊ शकतात आणि यामुळे इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा धोका निर्माण होणार नाही. युएईसह अनके मध्य पूर्वेकडील देशांनी फील्ड रुग्णालय उभारून कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळवले आहे.

भारतात आहेत का ‘फील्ड रुग्णालय’ ? 

दरम्यान भारतातही कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान अशाप्रकारची तात्पुरत्या रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु रुग्णालयांच्या पर्यायाने यातील सेवासुविधा अपुऱ्या पडतात. दरम्या मध्य पूर्व देशांनी अशाप्रकारच्या रुग्णालयांमध्य़े अधिक सेवासुविधा देऊन कोरोनावर नियंत्रण मिळवले. अशी रुग्णालये शहरांबाहेर कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी काही दिवसांसाठी तयार केली जाऊ शकतात. यामुळे इतर सामान्य रुग्णालयांवरील ताण कमी होईल व इतर रुग्णांना संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही.

- Advertisement -

मध्य पूर्व देशांनी फील्ड रुग्णालयाच्या जोरावर कमी केला कोरोना संसर्ग 

दरम्यान युएईमध्ये अशाप्रकारची अनेक फील्ड रुग्णालये उभारण्यात आली आहेत. तर दुबई देशात दोन फील्ड रुग्णालये उभारण्यात आली आहे. या प्रत्येक रुग्णालयांमध्ये चार ते पाच हजार बेड्सची व्यवस्था आहे. शिवाय दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरलाही कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी ३ हजार बेड्सच्या रुग्णालयात बदलण्यात आले होते. अशी माहिती दुबईच्या हेल्थ अथॉरिटीसचे डायरेक्टर जनरल हुमैद अल कुतामी यांनी दिली होती. दरम्यान भारतातही डीआरडीओतर्फे कोरोना रुग्णांच्या उपचारासठी दिल्लीत नवीन कोविड सुविधा देणार रुग्णालय तयार केले जात आहे. या रुग्णालयात कोरोनावरील उपचारांसाठी ५०० बेडसची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच संरक्षणमंत्र्यांनी लखनऊमध्येही दोन तात्पुरती रुग्णालये तयार करण्याच्या सुचना डीआरडीओला दिल्या आहेत.


मेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क? कोणतं मास्क आहे सुरक्षित, WHO कडून गाईडलाईन्स जारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -