घरताज्या घडामोडीLive Update: बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर - संजय राऊत

Live Update: बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर – संजय राऊत

Subscribe

बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर – संजय राऊत


महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीनी घेतली कोरोनाची लस

- Advertisement -

शेतकरी संघटनांना आंदोलन संपवण्याचे आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत असून त्यांनी यावेळी इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱ्या स्थानी असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

केवळ १५० रुपयात घ्या LICपॉलिसी; मिळवा १९ लाख रुपये, कधीही काढू शकता पैसे

देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC). ही विमा कंपनी प्रत्येक वेळी ग्राहकांच्या फायद्याकरता काही खास योजना आणत असते. नुकतीच या कंपनीने एक योजना आणली आहे. या योजनेमध्ये त्यांनी ग्राहकांच्या मुलांचा विचार केला आहे. या योजनेचे नाव देखील तसेच आहे. ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लॅन’. या योजनेमध्ये मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला पालकांना देखील मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे त्यांना खर्चाची तशी गणित आखावी लागतात. त्याचनुसारच ही पॉलिसी योजना आणली आहे. या योजनेमध्ये १५० रुपये भरुन तुम्हाला १९ लाख रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू पण…. – सामना अग्रलेख

मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य याबाबतचे निकाल सरकारच्या तोंडाकडे पाहूनच दिले जातात. सर्वोच्च न्यायालापासून हाकेच्या अंतरावर देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायमूर्तींनी कुंपणावरच निकाल दिला. अर्णब गोस्वामी प्रकरणात व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी हक्काची पायमल्ली झाल्याचे न्यायालयाला दिसते, पण लाखो शेतकऱ्यांचे तडफडून मरणे हे मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्यांच्या व्याख्येत बसत नाही. ऊठसूठ लोकांवर देशद्रोहाची कलमे लावून बेजार केले जात आहे. हा विषय थेट सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात येतो, पण येथे आमची अर्थव्यवस्था गप्प आहे. आपले पंतप्रधान मोदी हे नक्कीच चैतन्यमूर्ती, लोकप्रिय नेते आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्यावर मुद्रा उठवली आहे. मोदींनीही त्याबदल्यात न्यायालयास प्रमाणपत्र देऊन टाकले आहे, अशी टीका सोमवारच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्राकडून करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेने मोदींचे भरभरून केलेल्या कौतुकावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात नेमक बोट ठेवण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणावर न्यायालयाची भूमिका आणि शेतकरी आंदोलनावर न्यायालयाचा निकाल यासारख्या गोष्टींवरही सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे. (samana editorial slams supreme court bias role over ongoing farmer protest at delhi against new farm laws)


मोदी सरकारने चीनला रोखण्यासाठी लडाखमध्ये खिळे ठोकायला हवे होते

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी लादलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिसांचारामुळे दिल्लीतील राजमार्ग बॅरिगेट्स लावून खिळे ठोकून रस्ते बंद करण्यात आले. यावरुन पंतप्रधान मोदींवर अनेकांकडून टिकाही करण्यात आली. ‘विरोधक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी दिल्लीचा राजमार्ग खोदले,बॅरिगेट्स आणि खिळे ठोकण्यात आले. अशी पावलं मोदी सरकारने लडाख येथे चीनच्या आक्रमक सैन्याला रोखण्यासाठी करायला पाहिजे होते’, असे एआईएमआईएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ‘मोदी सरकराने शेतकऱ्यांच्या ‘मन की बात’ ऐकावी’, असे म्हणत ओवैसी यांनी मोदी सरकरावर सडकून टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकरावर ओवैसी यांनी हल्लाबोल केला.


मीरा रोड परिसरात रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -