मोचा चक्रीवादळ झालं अतितीव्र; ताशी 134 किमी वेगाने वाहणार वारे

मोचा चक्रीवादळाचे अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी, 12 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मध्य दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पोर्ट ब्लेअरच्या पश्चिम- वायव्येस सुमारे 520 किमी अंतरावर घोंघावत होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Cyclone Mocha intensified Winds will blow at a speed of 134 km per hour
Cyclone Mocha intensified Winds will blow at a speed of 134 km per hour

मोचा चक्रीवादळाचे अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी, 12 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मध्य दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पोर्ट ब्लेअरच्या पश्चिम- वायव्येस सुमारे 520 किमी अंतरावर घोंघावत होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या चक्रीवादळामुळे पुर्वेकडील अनेक राज्यांत आणि अंदमान- निकोबार जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( Cyclone Mocha intensified Winds will blow at a speed of 134 km per hour )

चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बांगला देश आणि म्यानमारने तयारी केली असून, किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मोचा चक्रीवादळामुळे बुधवारी पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडं उन्मळून पडली. मच्छिमारांना रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोचा मुळे शनिवार त्रिपुरा आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मोचा चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात आणखी तीव्र होण्याची अधिक शक्यता आहे. ते बांगला देशचा आग्नेय भाग आणि म्यानमारचा उत्तरेकडील किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. अतिशय उग्र रुप धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे ताशी 150-160 किमी ते 175 वारे वाहू शकते, असे हवामान विभगाने म्हटले आहे.

पुढच्या दोन दिवसांत दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, अंदमानचा समुद्र खवळलेला असेल. मच्छिमार, जहाजे, बोटी आणि मच्छिमार ट्रॉलर यांनी आग्नेय बंगालच्या उपसागरात 12 मेपर्यंत आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात 14 मेपर्यंत जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

( हेही वाचा: ट्विटरचा CEO पुन्हा बदलला, लिंडा याकारिनो यांची नियुक्ती; एलॉन मस्कची माहिती )