घरताज्या घडामोडीLive Update: तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील २७४ कामगारांपैकी २२० जणांना वाचविण्यात नौदलाला...

Live Update: तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील २७४ कामगारांपैकी २२० जणांना वाचविण्यात नौदलाला यश

Subscribe

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील २७४ कामगारांपैकी २२० जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे, तर २२ जणांचा मृत्यू झाल्याबाबत यल्लो गेट पोलीस ठाण्यात २२ अपमृत्युंची नोंद करण्यात आली आहे.


भारतीय रेल्वेने आतापर्यंत देशभरातील विविध राज्यांमध्ये ७७५हून अधिक टँकरमधून सुमारे १२ हजार ६३० मॅट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला.

- Advertisement -


अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसीसचे १० रुग्णांची नोंद आहे. खाजगी रुग्णालयात जवळपास २००हून अधिक रुग्ण असल्याची माहिती मिळतेय. यामधून एका खाजगी रुग्णालयात एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण त्याची सरकारी नोंद अद्यापही घेतली गेली नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

चक्रीवादळात झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही असाही आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.


देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा राज्यांमधी ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली. त्यामध्ये राज्यातील अहमदनगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, बीड, परभणी, सांगली, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर या १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता.


बार्ज P-305 दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. INS कोचीनंतर INS कोलकाता ही युद्धनौक मुंबईच्या बंदरावर पोहोचली आहे. बार्ज P-305 दुर्घटनेतील वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना परत आणलं आहे. शिवाय अनेक मृतदेह देखील आणण्यात आले आहेत. अधिकृतरित्या ३७ मृतदेह हाती सापडले आहेत. तर 38 कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. बार्ज P-305 वर एकूण २६१ कर्मचारी होते. त्यातील १८८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.


खासदार छत्रपती संभाजीराजे २७ मे रोजी मुंबईत मराठा आरक्षणा संदर्भात पत्रकार परिषद घेणार. यावेळी आरक्षणाबाबतची पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता.


देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० राज्यांमध्ये ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. आज सकाळी ११ वाजता व्हिडीओ कान्फरन्सिंद्वारे ही बैठक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर चर्चा करणार आहे. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत.


देशात गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ०७० नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ३ हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी गेला आहे.


म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार-हरियाणाचे राज्यपाल असलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जगन्नाथ पहाडिया यांचे बुधवारी रात्री कोरोनाने निधन झाले. गुडगाव येथील रुग्णालयात पहाडिया यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर राजस्थान सरकारने शोक दिवस आणि सरकारी कार्यालयांमध्ये एकदिवसीय सुट्टीची घोषणा केली आहे.


ठाण्याच्या वाडिया रुग्णालयात RT-PCR टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने कंत्राटी आरोग्य विभागातील तेजपाल मंगवाना या वॉर्डबॉयसह आणखी एक आरोपी संकपाल भास्कर धवणे याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, १२०० ते १५०० रुपयांमध्ये ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर, गुन्हे शाखेने कारवाई करुन तेजपाल मंगवाना या आरोपीला अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी संकपाल भास्कर धवणे याचे नाव समोर आले.


तौत्के वादळाचा फटका कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला आहे. या वादळात २९२ घरांचे नुकसान झाले असून ४ जण किरकोळ जखमी झाले आहे. या घरांच्या नुकसानाची कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -