घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे फलित व्हाव, कोकणाला मदत करताना राज्य सरकारचा हात आखडता -...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे फलित व्हाव, कोकणाला मदत करताना राज्य सरकारचा हात आखडता – देवेंद्र फडणवीस

Subscribe

कोरोनासंदर्भात रत्नागिरीचा डेथ रेट जास्त

तौत्के चक्रीवादळामध्ये कोकणात मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास आणि आढावा घेण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी रत्नागिरीती नुकसानीची पाहणी केली. रत्नागिरीत १२०० गावांमध्ये वीज खंडित झाली असून अद्याप १०० गावांत लाईन विस्कळीत झाल्यामुळे अंधारात आहेत. तर २५० हेक्टरपर्यंत पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रावारी कोकणातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याचे फलित व्हावे अशी आशा व्यक्त केली आहे. कोकणातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले असून राज्य सरकार कोकणाला मदत करण्यात हात आखडता घेत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये चक्रीवादळाने ५ हजार पेक्षा अधिक घरांची पडझड झाली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे आलेल्या माहितीनुसार १ हजार २०० गावांमध्ये वीज लाईन विस्कळीत झाली होती तर आता १०० गावांमध्ये विस्कळीत आहे. २५० हेक्टरपर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळबाग पिक म्हणजे आंबा पिकाचे नुकसान तसेच इतर फळांचेही मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमार बांधवांच्या १०० बोटींचे नुकसान झाले आहे. १०० शाळांवरचे छत गेले आहेत. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोविड सेंटरचे देखील नुकसाना झालंय अजूनही पंचनामे करण्यात येत आहेत.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला त्यावेळी मदत निधी वाटप केला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले यामध्ये आतापर्यंत १५० कोटी रुपया वाटप करण्यात आले आहेत. आता एकुणच खरे म्हणजे निसर्ग चक्रीवादाळाचा कोकणाला मोठा फटका बसला होता. परंतु १५० कोटी रुपये मदत करण्यात आली असेल तर शिवसेनेनं केलेल्या घोषणा पोकळ होत्या. कोकणाने शिवसेनेला भपूर दिले आहे. परंतु आता देण्याची वेळ आल्यास शिवसेनेचे हात आखडतो आहे. माझ्या माहितीनुसार प्रत्येकजण आपल्या मतदारसंघासाठी ५०० ते ६०० कोटी रुपये घेऊन जात आहे. त्यावेळी चक्रीवादळामध्ये प्रभावित झालेल्या जिल्ह्यांना मदत केली जात नसल्याचे योग्य नाही असे फडणवीसांनी म्हटले आहे.

कोरोनासंदर्भात रत्नागिरीचा डेथ रेट जास्त

कोरोनाच्या परिस्थितीत रत्नागिरीमध्ये कोरोना मृत्यूदर जास्त आहे. त्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या निधीतून मदत करण्याचा विचार केला आहे. रत्नागिरीत ६ कोविड सेंटर ऑक्सिजनेटेर आणि १०० ऑक्सिजन काँन्सेंट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आले आहेत. भाजपचे सर्वच लोकप्रतिनीधी मदत करत आहेत. राणे साहेबांनीही मोठी मदत केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने तातडीची मदत द्यावी

नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीची मदत द्यायला सुरुवात केली पाहिजे. राज्य सरकारकला एसडीआरएफमधून मदत करता येऊ शकते. केंद्र सरकार एनडीआरएफ मधून एसडीआरएफमध्ये पैसे देते हे पैसे राज्य सरकार वर्षभर वापरु शकते जर संपले तर पुन्हा मागू शकते. आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती आहे की, अत्यंत वेगाने महाराष्ट्र सरकार मदत करु शकते त्यामुळे वाट न पाहता प्राथमिक मदत दिली पाहिजेट

आपेक्षा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकणच्या दौर्याचे फलित व्हावे, मुख्यमंत्री रायगडला गेले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केल्या परंतु त्या पुर्ण केल्या नाहीत. अंमलात आणलेल्या दिसत नाही आहेत कोकणाची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. चक्रीवादळामध्ये वाड्या उन्मळून गेल्या होत्या या झाडांना ५०० रुपये झाड ३०० रु झाड अशा पद्धतीने मदत करुन चालणार नाही. अशा स्थितीत विशेष निकष लावावे लागतात यामुळे हेक्टरी मदत करावी १०० टक्के मदत राज्य सरकारला करता येणार नाही परंतु वर्षभर तरी चालेल एवढी मदत राज्य सरकारने केली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. राजकारणाकरता प्रेम दाखवले जाते तेवढेच प्रेम संकटात दाखवावं असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -