घरदेश-विदेशनीट नाच सांगितले, तर तरुणांनी गोळी झाडली

नीट नाच सांगितले, तर तरुणांनी गोळी झाडली

Subscribe

अविनाश जमिनीवर कोसळला आणि लोकांना समजले की, काहीतरी झाले आहे. तोपर्यंत मारेकऱ्यांनी पळ काढला.

डान्स स्टेपची विनोदी नक्कल केल्याप्रकरणी एक डान्स टिचर आणि दोन तरुणांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादामध्ये दोन तरुणांनी डान्स टिचरच्या छातीमध्ये गोळी झाडली. गर्दीमध्ये गोळी चालवल्याचा आवाज आला नाही, मात्र गोळी लागलेला डान्स टिचर अविनाश सांगवान जमिनीवर कोसळला, तेव्हा त्याच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. तोपर्यत गोळी झाडणाऱ्या तरुणांनी पळ काढला होता. दिल्लीच्या मंदिर मार्ग विभागात ही घटना घडली असून या घटनेविरोधात पोलिसामध्ये तक्रार दाखल झाली आहे. पोलिस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं?

वाल्मीक ऋषी जयंती निमित्ताने बुधवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीच्या मंदिर मार्ग विभागात मिरवणूक सुरु होती. या मिरवणूकीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये देवाचे नामस्मरण सुरु होते. ढोल ताशांच्या गजरात काही भाविक डान्सही करत होते. यामध्ये अविनाश सांगवान हा २२ वर्षीय तरुण देखील डान्स करत होता. विशेष म्हणजे अविनाश हा डान्स टिचर आहे. तो लहान मुलांना डान्स शिकवायचा. दरम्यान, या मिरवणूकीत काही तरुण शिरले. त्यांनी अविनाशच्या डान्स स्टेपची नक्कल करण्यास सुरुवात केली. यावर दोघांचा वादविवाद झाला आणि त्या तरुणांनी अविनाशच्या छातीत गोळी झाडली आणि त्यांनी तेथून पळ काढला.

- Advertisement -

रुग्णालयात गेल्यावर मृत घोषित केले

यानंतर घटनास्थळी असलेल्या काही लोक अविनाशला एका खाजगी गाडीने राम मनोहर लोहिया या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या तरुणांविरोध तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -