लसीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल, स्वदेशी mRNA लसीला मान्यता

आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी दिली असून पुण्याच्या जेनोव्हा बायफार्मा या कंपनीने ही लस तयार केली आहे. १८ वर्षांवरील लोकांना ही लस दिली जाणार आहे.

1 crore people vaccinated in mumbai today

भारताने विकसित केलेल्या स्वदेशी mRNA लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) परवानगी दिली आहे. आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी दिली असून पुण्याच्या जेनोव्हा बायफार्मा या कंपनीने ही लस तयार केली आहे. १८ वर्षांवरील लोकांना ही लस दिली जाणार आहे. तसेच, ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना देण्याकरता सीमरच्या कोवोव्हॅक्स कोविड-19 लसीलाही मान्यता देण्यात आली आहे. (DCGI approved desi mrna covid vaccine from gennova for 18 years and above people)

हेही वाचा – ‘हर घर दस्तक’ मोहिमेद्वारे गतिमान लसीकरण, १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण

बायो फार्माच्या m-RNA लसीसाठी आपत्कालीन वापरासाठी (EUA) विषय तज्ज्ञ समितीने शिफारस केली. यासाठी बायो फार्मास्युटिकलने सादर केलेला डाटा समाधानकारक असल्याने भारताच्या औषध नियामक अंतर्गत विषय तज्ञ समितीने ही परवानगी दिली. पहिला अहवाल त्यांनी एप्रिलमध्ये सादर केला होता. त्यानंतर पुन्हा मे महिन्यात कंपनीने अहवाल सादर केला. आता, जूनमध्ये त्यांना अखेर आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा – Corona PM Modi : कोरोनावर पंतप्रधान मोदींचा मंत्र; लसीकरण मोठे संरक्षण कवच, मुलांच्या लसीकरणास प्राधान्य

मे महिन्यात बायो फार्मास्युटिकल कंपनीने जेनोव्हाने फेज ३ चा अहवाल दिला होता. या अहवालानुसार, या लसीने सुरक्षितता, प्रतिकारशक्ती आणि सहनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी ४ हजार जणांवर फेज २ आणि फेज ३ च्या चाचण्या घेतल्या आहेत. तसेच, ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापामानात ठेवली जाते.

ही लस नक्की कशी काम करते?

मेसेंजर आरएनए हा एक प्रकारचा आरएनए आहे जो शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक असतो. mRNA पेशींमध्ये प्रथिने कशी तयार केली जातात याची ब्लूप्रिंट सेट करते. यासाठी तो जनुकांची माहिती वापरतो. एकदा पेशी प्रथिने तयार करतात, ते त्वरीत mRNA मोडतात. लसीचा mRNA पेशींच्या केंद्रकात प्रवेश करत नाही आणि DNA मध्ये बदल करत नाही.

हेही वाचा children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

कोरोनाची mRNA लस दंडावरच दिली जाते. या लसीचे दोन डोस दिले जाणार असून २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणारआहे. ही लस आत पोहोचते आणि पेशींमध्ये स्पाइक प्रोटीन तयार करते. स्पाइक प्रोटीन्स देखील कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर आढळतात. अशाप्रकारे, जेव्हा शरीरात प्रथिने तयार होतात, तेव्हा आपल्या पेशी mRNA तोडून काढून टाकतात. जेव्हा आपल्या पेशींवर स्पाइक प्रथिने बाहेर पडतात, तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याला शत्रू म्हणून मारण्यास सुरुवात करते. यासह, कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन्स देखील नष्ट होतात.

तसेच, सीरम इन्स्टिट्युटच्या ७ ते ११ वर्षाे वयोगटातील मुलांसाठीही लसीला मान्यता देण्यात आली आहे. आपत्कालनी वापरासाठी ही मान्यता देण्यात आली असून यामुळे लहान मुलांना चांगलाच फायदा होणार आहे.