घरदेश-विदेशसंरक्षण मंत्र्यांनी लोणचे घालण्यासाठी घेतली सुट्टी

संरक्षण मंत्र्यांनी लोणचे घालण्यासाठी घेतली सुट्टी

Subscribe

आपला भारत देश विविध जाती-धर्म-पंथ, त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीने नटलेला आहे. अशीच एक परंपरा आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथे एक अशी प्रथा आहे की, तिथे लोक स्वतः घरी आंब्याचे लोणचे तयार करतात. हे घरी तयार केलेले लोणचे त्यांच्या सासरी गेलेल्या मुलीला दरवर्षी भेट म्हणून देतात. ही प्रथा तिथले लोक आनंदाने पार पाडतात. आंध्र प्रदेशच्या ज्या भागात ही परंपरा जपली जाते, त्याच भागात देशाच्या विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांची सासरवाडीदेखील आहे. त्यामुळे त्यादेखील ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आवडीने जपतात. सितारमण याबाबत सांगतात की, त्यांचे सासु-सासरे त्यांच्या मुलींसाठी दरवर्षी लोणचे तयार करत होते. आता मीदेखील त्यांची परंपरा पुढे चालवत आहे. या लोणच्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे सितारमण यांना राजकारण आणि देशाइतकेच घरच्या परंपरा आणि नाती सांभाळणे तितकेच महत्त्वाचे वाटत असल्याचे समजते.

लोणचे घालण्यासाठी सुखोई विमानाचा वापर

लोणचे घालण्यासाठी निर्मला यांनी सुट्टी मागितली. परंतु संरक्षण मंत्री असल्याने दिल्लीवरुन आंध्रप्रदेशला जाण्यासाठी त्यांना सुखोई विमानाने प्रवास करावा लागला. हे सुखोई विमान आपले हवाई दलाचे जवान युद्धासाठी वापर करतात. ते विमान सितारमण यांनी आंध्रप्रदेशला जाण्यासाठी वापरले.

- Advertisement -

वाचा – बॉलिवूडची फेवरेट किडनॅपिंग व्हॅन बंद होणार!

काय म्हणाले नितीन गडकरी याबाबत

लोणचे घालण्यासाठी सुट्टी हवी असल्याने सितारमण भाजपचे प्रमुख नेते नितीन गडकरी यांच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी गडकरींनी सितारमण यांना सुट्टीचे कारण विचारले असता, सितारमण यांनी सांगितले की, लोणचे घालण्यासाठी सुट्टी हवी आहे. यावर गडकरींना अश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘क्या निर्मला जी, आचार के लिये?’ त्यानंतर निर्मला यांनी गडकरींना त्यांच्या परंपरेविषयी संपूर्ण माहिती देऊन सुट्टी घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -