घरताज्या घडामोडीभारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा करार; भारत रशियाकडून घेणार ३३ फायटर जेट

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा करार; भारत रशियाकडून घेणार ३३ फायटर जेट

Subscribe

लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) चीनसोबत तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले. या संभाषणानंतर काही वेळातच दोन्ही देशामध्ये एक सुरक्षा विषयक करार झाल्याची माहिती मिळत आहे. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून ३३ लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १८ हजार १४८ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. याद्वारे भारत रशियाकडून सुखोई – ३०, मिग – २९ विमाने विकत घेणार आहे.

- Advertisement -

हे वाचा – पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून ३३ फायटर जेट विकत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ज्यामध्ये १२ सुखोई-३० विमाने, तर २१ मिग-२९ विमानांचा समावेश आहे. त्यासोबतच भारताकडे असलेल्या ५९ मिग-२९ विमानांना अपग्रेड केले जाणार आहे. यासोबतच संरक्षण मंत्रालयाने २४८ एअर मिसाइल विकत घेण्यासाठीही परवानगी दिलेली आहे. हे जादाचे एअर मिसाईल हवाई दल आणि नौदलाच्या कामी येणार आहेत. यासोबतच DRDOने तयार केलेल्या एक हजार किमी रेंज असणाऱ्या क्रूज मिसाइलच्या रचनेलाही अंतिम मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी ६ राफेल विमानाचा पहिला संच भारतात पोहोचणार आहे. जगातील सर्वात घातक शस्त्रांनी युक्त राफेल विमान भारतीय वायुदलात समाविष्ट होत असल्यामुळे भारताच्या लष्कराची ताकद नक्कीच वाढणार आहे. हे सहा विमाने फ्रांसवरुन उड्डाण घेऊनच येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -