घरदेश-विदेशदिल्ली विधानसभा: आपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या अलका लांबा यांना केवळ ४०४ मतं!

दिल्ली विधानसभा: आपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या अलका लांबा यांना केवळ ४०४ मतं!

Subscribe

दिल्लीच्या चांदणी चौक विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा या सध्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळत आहेत. तर आम आदमी पक्ष म्हणजेच आपचे उमेदवार प्रल्हाद साहनी हे आघाडीवर आहेत. सध्या दिल्ली विधानसभा निवडणूकसाठी मतमोजणी सुरू आहे. यंदा विधानसभा निवडणूकीआधी अनेकांनी पक्ष बदलले आणि तिकीट मिळवून निवडणूक लढवली. मात्र आता पक्ष बदल करणाऱ्या या नेत्यांना जनतेने नाकारलं असल्याचं दिसतय.

याच उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा. अलका लांबा यांना केवळ ४०४ मत मिळाल्याच समजतय. अलका लांबा या गेल्यावेळी आपकडून निवडणूक लढल्या होत्या आणि त्यांना आमदारकी ही मिळाली होती. मात्र यंदा त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचच त्यांना फटका बसला आहे.

- Advertisement -

आपचे उमेदवार प्रल्हाद साहनी हे चांदनी चौक मतदार संघातून आघाडीवर आहेत. प्रल्हाद साहनी पहिले भाजपमध्ये होते. मात्र त्यांनी अलका लांबा यांना आव्हान देत आपमध्ये प्रवेश केला. अखेर लांबा यांना पक्षातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -