घरताज्या घडामोडीदारू पिताना अडवले म्हणून त्याने मुलाला घातल्या गोळ्या, ३३ वर्षापूर्वी आईची केली...

दारू पिताना अडवले म्हणून त्याने मुलाला घातल्या गोळ्या, ३३ वर्षापूर्वी आईची केली होती हत्या!

Subscribe

दारू पिण्यापासून आडवले म्हणून त्याने आई आणि मुलाची हत्या केली आहे.

दिल्लीच्या रोहिणी जिल्ह्यात बुध बहजरमध्ये ६० वर्षाच्या पुरूषाने आपल्या मुलाची गोळी घालून हत्या केली आहे. आरोपीचं नाव ओमपाल सिंह आहे. याच व्यक्तीने ३३ वर्षापूर्वी आपल्या आईची देकील हत्या केली होती. या दोन्ही हत्यांमागे एकच कारण आहे ते म्हणजे दारू. या माणसाला दारू पिण्यापासून आडवले म्हणून त्याने आई आणि मुलाची हत्या केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी ओमपाल घरात दारू पित होता तेव्हा पत्नीने त्याला दारू पिऊ नकोस असे सांगितले. त्यामुळे ओमपाल रागवला. तो बायकोशी भांडण करू लागला. जेव्हा त्याच्या २८ वर्षाच्या मुलाने त्याला विरोध केला तेव्हा त्याने  मुलगा बलबीर सिंगला त्याच्या पिस्तुलाने गोळ्या घातल्या. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळावरून ओमपालला अटक केली आहे. या आधी ३३ वर्षांपूर्वी आपल्या आईची हत्या देखील ओमपालने केली होती. या घटनेनंतर त्याला मंगोलपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. ओमपाल हा व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहे. बलवीरशिवाय ओमपालला दोन मुली आणि एक मुलगा आहे.

सध्या पोलिसांनी त्याला तीन दिवसांच्या रिमांडवर आत घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचा पिस्तूल परवाना नोएडाहून मिळाल्याचे समजले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सावधान! सेक्स केल्यामुळे होतोय कोरोना…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -