धक्कादायक: नवरा विसरला लग्नाचा वाढदिवस म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल!

दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना घडली असून अजून पोलिस याचा तपास करीत आहेत.

women suicide for his husband not wish marriage anniversary
धक्कादायक: नवरा विसरा लग्नाचा वाढदिवस म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल!

पतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे रागाच्या भरात एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. शाहदारा जिल्ह्यातील मानसरोवर पार्क मधील ही घटना घडली आहे. मात्र या महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंड्यामुळे छळ केल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही आहे.

या मृत महिलेचे नाव आकांक्षा असून ती २७ वर्षांची आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आकांक्षा कुटुंबासमवेत नत्थू कॉलनी परिसरात राहत होती. आकांक्षाचा पती अंकित एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत असून ती सरकारी शाळेत शिक्षिका होती. ११ मे २०१८ रोजी या दोघांचे लग्न झाले होते.

आकांक्षाचा पती अंकितने पोलिसांनी असे सांगितलेे की, सोमवारी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळेस तो पत्नीला शुभेच्छा द्यायला विसराला. त्याचा राग आला आणि तिने हे पाऊल उचलले. आकांक्षाची आई संतोष देवी यांनी सांगितले की, तिच्या सासऱ्याचा लोकांनी सोमवारी ताबडतोब घरी या. आकांक्षा ला तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे, असे सांगितले. पण घरी गेल्यावर तिच्या मृत्यू झाल्याचे समजले. आकांक्षाने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे सासरच्या लोकांनी सांगितले.

मात्र त्याचवेळेस आकांक्षा आईने सासरच्या लोकांनावर आरोप केला की, आकांक्षाला सासरच्या घरात त्रास देण्यात आला. तिचा जबरदस्तीने पगार काढून घेत असत. तसेच तिला मुल नसल्यामुळे तिला टोमणे मारत असत.

सध्या पोलिस नातेवाईकांच्या आरोपांचा तपास करत आहे. शवविच्छेदनानंतर मंगळावारी आकांक्षाचा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: ३ वर्षाच्या चिमुकल्याने कप केक्स विकून पोलिसांसाठी ५० हजारांचा गोळा केला निधी