घरदेश-विदेशया कारणास्तव दिल्लीमध्ये वाढते प्रदुषण

या कारणास्तव दिल्लीमध्ये वाढते प्रदुषण

Subscribe

दिल्लीमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये प्रदुषणाचे प्रमाण खूप वाढते. हरियाणा, पंजाबमध्ये शेतकरी शेतीसाठी पालापाचोळा जाळतात. त्यामुळे दिल्लीची हवा ही अधिक प्रमाणामध्ये प्रदुषित होते.

दिल्ली देशातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून ओळखले जाते. वायु प्रदुषणाच्या बाबतीत दिल्लीचा देशात अव्वल नंबर लागतो. ऑक्टोबर – नोव्हेबरमध्ये दिल्लीमध्ये श्वास घेणे देखील मुश्लिक होऊन बसते. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, ऑफिसेस सर्व बंद ठेवावे लागते. ऑक्टोबर – नोव्हेंबरच्या दरम्यान हरियाणा, पंजाबमध्ये गहूच्या शेतीची तयारी केली जाते. त्यावेळी जमीनीच्या मशागतीपासून सर्व कामांना सुरूवात होते. त्यासाठी शेतीतमध्ये पालापाचोळा देखील जाळला जातो. परिणामी, मोठया प्रमाणावर धुरीचे लोट हे दिल्लीच्या दिशेने येतात. त्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पाहायाला मिळते. वाढते शहरीकरण आणि वाहनांची प्रचंड संख्या देखील यामध्ये भर घालते. याचमुळे प्रदुषणामध्ये वाढ होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पालापाचोळा जाळू नये, त्यासाठी आता वेगळी पद्धत शोधावी अशी मागमी होत आहे.

दिल्ली बनते गॅस चेंबर

ऑक्टोबर – नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला गॅस चेंबरचे स्वरूप प्राप्त झालेले असते. श्वास घेणे देखील मुश्लिक होऊन बसते. लोक मास्क लावून ऑफिस गाठणे किंवा घराबाहेर पडणे पसंत करतात. या दिवसांमध्ये शाळा, कॉलेजला देखील सुट्टी जाहीर करावी लागते. दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे लोकांना श्वासनाचे आजार, घशाचे आजार शिवाय छातीमध्ये दुखणे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रदुषित हवेमुळे दिल्लीकर घराबाहेर पडणे देखील टाळतात. त्यामुळे यावर उपा काय असा सवाल आता केला जात आहे. हरियाणा, पंजाब सारख्या राज्यांच्या सीमा या दिल्लीच्या सीमेला लागून असल्याने त्याचा थेट परिणाम हा दिल्लीला जाणवतो. शिवाय, हवेमुळे देखील धुरांचे लोट हे दिल्लीच्या दिशेने प्रचंड वेगाने येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -