Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिल्ली हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपींना अटक

दिल्ली हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपींना अटक

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या हिंसाप्रकरणी दोन प्रमुखांना अटक करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

नव्या कृषी कायद्याविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनकडून आंदोलन करण्यात आले होते. या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रक्टर रॅली काढली होती. मात्र, या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. यामधील प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ४५ वर्षीय मोहिंदर सिंग आणि ३० वर्षीय मनदीप सिंग या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही आरोपींना जम्मूमधून अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांमध्ये या दोघांचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

काही दिवासांपूर्वी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून कलाकार दीप सिद्धूला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर तब्बल २०० संशयितांची छायाचित्रे देखील जारी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता दिल्लीच्या हिंसाप्रकरणी दोन प्रमुखांना अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत मोहिंदर सिंग?

मोहिंदर सिंग हे जम्मूच्या सातबारी भागातले रहिवासी असून काश्मीर युनायटेड फ्रंट ऑर्गनायझेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी त्यांना कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली आहे.

पत्नीने व्यक्त केली नाराजी

- Advertisement -

याप्रकरणी मोहिंदर सिंग यांच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘त्यांना एसएसपी साहेबांनी बोलावले होते. जर त्यांना भिती वाटली असती तर त्यांनी १० लोकांना सोबत नेले नसते. त्यांना सुरुवातीला वाटले की चौकशी करता बोलावण्यात आले. मात्र, खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे मुलाला चौकशी करण्याकरता पाठवले असता त्यांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – कर्नाटकमध्ये जिलेटिनच्या भीषण स्फोट सहा जणांचा मृत्यू, एक जखमी


 

- Advertisement -