घरदेश-विदेशसंवेदनशील काळात भारताला शस्त्रे देऊ नका; चीनची रशियाला विनंती

संवेदनशील काळात भारताला शस्त्रे देऊ नका; चीनची रशियाला विनंती

Subscribe

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, अशी विनंती चीनने रसियाला केली आहे.

भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. भारत-चीन हिंसक चकमकीनंतर भारत सतर्क झाला आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर आहेत. त्यांचा सरशिया दौरा आताच्या घडीला अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तत्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियामधील विजय दिन साजरा करण्यासाठी मॉस्को येथे दाखल झाले आहेत आणि या दरम्यान संरक्षण कराराबाबत चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे अधिकृत वृत्तपत्र पीपल्स डेलीनेही रशियाला ‘संवेदनशील’ काळात भारताला शस्त्रे विकू नये असा सल्ला दिला आहे.

“तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत,” असं पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिलं आहे. दरम्यान, लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताला ३० लढाऊ विमान खरेदी करायची आहेत, ज्यामध्ये मिग जी२९ आणि १२ सुखोई ३० एमके यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: लॉकडाऊनमुळे देशातील २४ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम


सैन्य माघारीवर भारत-चीनमध्ये मतैक्य

पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष क्षेत्रांतून आपापले सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांत ११ तासांच्या प्रदीर्घ चर्चेत मतैक्य झालं. सोमवारी उशिरापर्यंत वरिष्ठ कमांडर्सची ही बैठक पार पडली. मात्र ही सैन्य माघार टप्प्याटप्प्याने किती कालावधीत घ्यावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व १४व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, चीनच्या बाजूने तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे मेजर जनरल लिउ लिन यांनी चर्चेचे नेतृत्व केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -