घरदेश-विदेशधक्कादायक...तरुणाच्या कानातून काढली चक्क झुरळाची पिल्ले

धक्कादायक…तरुणाच्या कानातून काढली चक्क झुरळाची पिल्ले

Subscribe

एका २४ वर्षीय तरुणाच्या कानातून चक्क १० झुरळांची पिल्ले काढल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

झुरळ पाहिलं की बऱ्याच व्यक्तींची पहिली प्रतिक्रिया इइ…झुरळ…अशी असते. तर एखाद झुरळ बाजूला आल किंवा अंगावर आल तरी अनेकांना त्याची किसळ वाटते. मात्र, हेच जर झुरळ तुमच्या कानात गेल तर हाहा:कारच. अशीच एक घटना चीनमध्ये घडल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये एका २४ वर्षाच्या तरुणाच्या कानात अचानक तीव्र वेदना होण्यास सुरुवात झाली. तसेच या व्यक्तीच्या कानामध्ये हालचाल होताना दिसत होती. मात्र, हे कशामुळे होत आहे हे काही कळू शकले नाही. अखेर त्या तरुणाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कानाची तपासणी केल्यानंतर तरुणाच्या कानात झुरळ असल्याचे सांगितल्यानंतर रुग्णासह त्याच्या घरातल्यांना धक्काच बसला.

- Advertisement -

नेमके काय घडले?

चीनमध्ये राहणाऱ्या एल. व्ही. या २४ वर्षीय तरुणाच्या कानात अचानक अनेक तीव्र वेदना होण्यास सुरुवात झाल्याने या तरुणाला डॉक्टर यिजिन झोंग यांच्याकडे घेऊन गेले. दरम्यान, डॉक्टरांनी त्या तरुणाला इतक्या तीव्र वेदना का होत आहेत. हे पाहण्यासाठी त्या तरुणाच्या कानामध्ये बॅटरी घालून पाहिले असता. कानात काहीतरी हालचाल होताना दिसत होती. मात्र, स्पष्ट काही दिसत नव्हते. अखेर डॉक्टरांनी त्या तरुणाच्या कानाची सोनोग्राफी केली असता ही हालचाल चक्क झुरळांची असल्याचे दिसून आले. तसेच या तरुणाच्या कानात चक्क एक दोन नव्हे तर १० झुरळांची पिल्ले रेंगाळताना दिसत होती. त्यामुळे एल. व्ही. हा तरुण अस्वस्था होता. अखेर डॉक्टरांना त्या तरुणाच्या कानातून झुरळ काढण्यात यश आले आहे आहे.

घरगुती स्वच्छता नसल्यामुळे झुरळांचा प्रसार होतो. तसेच आजूबाजूला असणाऱ्या नाले आणि गटारांमुळे झुरळांची उत्पत्ती होते. त्यामुळे रात्री झोपताना दारे खिडक्या लावून झोपावे. त्याचप्रमाणे झोपताना डासांची जाळी देखील लावावी, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या ईएनटी उपप्रमुखांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दारू पिण्यासाठी पित्यानं केला चार दिवसांच्या बाळाचा सौदा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -