घरCORONA UPDATE'होऊ द्या कोरोना, आम्हाला उपचार नको', ७ महिलांसह १७ जणांना अटक

‘होऊ द्या कोरोना, आम्हाला उपचार नको’, ७ महिलांसह १७ जणांना अटक

Subscribe

देशभरात एकीकडे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. तर दुसरीकडे काही समाजकंटक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत त्यांना लक्ष्य करत आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे देखील आरोग्य पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला क्वारंटाईन करायला गेलेल्या आरोग्य पथक आण पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात महिलांचा देखील सहभाग होता. आरोग्य कर्मचारी चुकीचे इंजेक्शन देत असून आम्हाला तुमचे उपचार नको, असा आरोप यावेळी या महिलांनी केला.

काय आहे प्रकरण

मुरादाबादच्या नवाबपुरा मोहल्ल्यात हाजी नेब मशिदीच्या परिसरात सरताज नावाच्या इसमाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. सरताज कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यानंतर बुधवारी मृताच्या संपर्कात असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी नवाबपुरा मोहल्ल्यात आली. मात्र आरोग्य पथकावर अचानक मोहल्ल्यातून दगडफेक सुरु झाली. आरोग्य पथकाचा भाग असलेले डॉ. एस.सी. अग्रवाल या हल्ल्यातून कसेबसे वाचले. त्यांनीच या प्रसंगाचे कथन केले.

- Advertisement -

“आम्ही नवाबपुरा येथे संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी गेलो होते. मृत रुग्णाचे कुटुंबिय आमच्यासोबत यायला तयार होते. ते गाडीतही बसले. पण अचानक काही शेकडो लोकांचा जमाव आमच्या दिशेने चालून आला. दडग, धारदार हत्यारासहीत त्यांनी आमच्या पथकावर हल्ला चढवला. मी देखील जखमी झालो. पण कुणीतरी माझ्या हाताला धरून मला त्या झटापटीतून बाहेर काढले आणि मी वाचलो.” डॉ. एस.सी. अग्रवाल यांनी आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला.

आरोपींचे काय म्हणणे आहे

हल्ला करणाऱ्यांपैकी १७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ७ महिलांचा देखील समावेश आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “आम्हाला चुकीचे इंजेक्शन दिले जाते. जेवायला देत नाहीत. त्यामुळे आम्हाला कोरोना व्हायचा असेल तर होऊ द्या, पण आम्हाला तुमचे उपचार नको.” आतापर्यंत २०० अज्ञात हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -